Credit to Prashant Bhai for Handwriting of Shreya Sajn 
पश्चिम महाराष्ट्र

ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ः तीच्या हस्ताक्षराला प्रशांतभाऊंमुळे मिळालंय सुवर्णकोंदण 

मुरलीधर कराळे

नगर ः रानू मंडल यांच्या गाण्याची दखल एका रात्रीत सोशल मीडियाने घेवून तिला देशपातळीवर पोचविले. राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने रातोरात्र देशपातळीवर त्यांची चर्चा झाली. अशीच काहीशी चर्चा नगर जिल्ह्यात होतेय श्रेया सजन या विद्यार्थीनीची.

शालेय हस्ताक्षर स्पर्धेत ती हस्ताक्षर काढताना तिच्या वडिलांनी व्हिडिओ सहज म्हणून सोशल मीडियावर शेअर केला. ई सकाळने तिच्या या हस्ताक्षर प्रवासाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. तो पाहून साहित्यिक नजर असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रशांत गडाख यांनी कृतज्ञता पुरस्कार सोहळ्याच्या लाखभर पत्रिका तिच्याच हस्ताक्षरातील छापून तिचा अनोखा गौरव केला. संत ज्ञानेश्‍वरांनी तेराव्या शतकात मराठी भाषेची नेवाशात थोरवी गाताना 

माझा मराठीची बोलू कौतुके 
परि अमृतातेहि पैजासी जिंके 
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन... 

अशा शब्दांचा वापर केला होता. त्याच नेवाशाच्या भूमीत जेजे सुंदर तेते पूज्य अशी भूमिका घेत यशवंत सामाजिक प्रतिष्ठान प्रशांतभाऊ गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आहे. श्रेयाच्या हस्ताक्षराला श्रेय दिलं आहे. 

श्रेया गोरथनाथ सजन ही विद्यार्थीनी कडूवस्ती (सात्रळ, ता. राहुरी) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीत आहे. तिचे हस्ताक्षर सुंदर आहे. हस्ताक्षरासाठी यापूर्वी विविध स्पर्धांत तिने बक्षिसे मिळविली आहेत. तिचे वडील त्याच शाळेत शिक्षक आहेत. हस्ताक्षर रेखाटताना तिच्या वडीलांनी सहज म्हणून एक व्हिडिओ फेसबूकवर व्हायरल केला.

हे सुंदर अक्षर पाहून नेटिझन्सने तिला डोक्‍यावर घेतले. फेसबूकवर हजारो लोकांनी कमेंट केल्या. लाईकही लाखाच्यावर गेल्या. हे हस्ताक्षर पाहून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी तिला फोन करून तिच्याशी बोलून अभिनंदन केले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही तिचे कौतुक केले.

याबरोबरच अमेरिकेतील रहिवासी व मूळ भारतीय असलेल्या रोहित काळे यांनी तिचे अभिनंदन करून तिच्यासाठी खास कॅलिग्राफी सेट असलेले गिफ्ट पार्सल पाठविले. सुंदर हस्ताक्षरासाठी वडिलांबरोबरच तिचे वर्गशिक्षक राजेंद्र शिंदे यांचेही तिला विशेष मार्गदर्शन लाभत आहे. 

प्रशांत गडाख यांच्याकडून खास गौरव 
जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रात तिचे कौतुक होत असतानाच जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत गडाख यांनी तिला बोलावून आपल्या मुख्य कार्यक्रमाचे निमंत्रणपत्र तयार करण्याचे सांगितले.

रविवारी (ता. 23) कृतज्ञता पुरस्कार सोहळा नेवासे येथील मुळा पब्लिक स्कुलवर आहे. या कार्यक्रमात सन्मानमूर्ती न्या. नरेंद्र चपळगावकर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, डॉ. पी. डी. पाटील, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे हे मोठे मान्यवर आहेत. 


अशा या भव्य-दिव्य होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका श्रेया सजन या विद्यार्थीने हस्ताक्षरात रेखाटली आहे. त्या पत्रिकेच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त पत्रिका छापून जिल्हाभर व राज्यभर वितरित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे श्रेयाचे नावही पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पत्रिका समाजात जाताच रातोरात ही श्रेया कोण, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे सोशल मीडियाच्या एका व्हिडिओमुळे आणि गडाख यांची साहित्यिक नजर तिला आता सातासमुद्रापार घेवून जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT