crime case in belgaum rupees 26 lakh in investment of insurance and documents 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात बनावट कागदपत्रांद्वारे २६ लाखांना घातला गंडा; पॉलिसीधारकांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांची २६ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सीईएन विभागाच्या पोलिसांनी बुधवारी (१०) एकाला अटक केली. मधुकर विलास सपळे (वय ३१, रा. शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन महागड्या मोटारी, बनावट कागदपत्रे व दाखले जप्त करण्यात आले आहेत. तपासणीत अंमलबजावणी संचालनालयासह वकिलांच्या नावे तयार केलेल्या बनावट नोटिसाही आढळल्या आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, एकजण पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनीतील विम्याचा कालावधी पूर्ण झालेल्या ग्राहकांच्या खात्यावरील रक्कम स्वतःच्या वा इतरांच्या खात्यावर वर्ग करुन फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर संशयिताने पॉलिसीधारकांना २६ लाखांना फसविल्याचे आढळून आले. पॉलिसीधारकाच्या विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करणे आवश्‍यक होते; परंतु तो ती रक्कम बनावट कागदपत्रांच्या आधारे पॉलिसीधारकांऐवजी स्वतः आणि इतरांच्या खात्यावर जमा करुन घेत असल्याचे आढळले. त्याच्याकडे बनावट रबर स्टॅम्प, मशिन्स, कागदपत्रे, प्रिंटर आदींसह एक इनोव्हा आणि एक स्विफ्ट डिझायर मोटारही सापडली.

नवी दिल्लीतील अंमलबजावणी संचलनालयाच्या नावे बनावट नोटीसा तयार केल्या होत्या. या नोटीसा बॅंकांना पाठवून ग्राहकांचे खाते गोठविण्याची सूचना केल्याचे उघडकीस आले. अशाप्रकारे त्याने युनियन बॅंकेला तीन नोटीसा पाठविल्या आहेत. तर आयडीबीआय, एसबीआय, खानापूरमधील बॅंक ऑफ महाराष्ट्र, संकेश्‍वरमधील एका बॅंकेला प्रत्येकी एक नोटीस पाठवून ग्राहकांचे खाते गोठविण्याबाबत कळविले आहे. तसेच सतीश कपिलेश्‍वरी यांच्या नावे जिल्हा आणि मुख्य न्यायाधीश असल्याचे दाखवून बनावट लिगल कौन्सिलिंगबाबत नोटीस पाठवल्याचे त्याने कबूल केले आहे.

बनावट कागदपत्रांची निर्मिती करुन पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयिताला पोलिस कोठडीत घेऊन सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीईएन पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस उपायुक्तांनी त्यांचे कौतुक करुन बक्षिसही घोषित केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT