crime cases in sangli miraj five accused arrested by police 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : तरुणाच्या खूनप्रकरणी पाच संशयितांना अटक; ग्रामीण पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथील भोरा म्हसोबा मंदिराजवळ धारदार शस्त्राने पाठलाग करून स्वप्नील दशरथ कांबळे (वय २६, रा. कर्नाळ) या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पाच तासांत संशयितांना अटक केली. पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

मुख्य हल्लेखोर प्रणव उर्फ पण्या प्रकाश माने (वय २०, रा. कर्नाळ), साथीदार अनिरुद्ध ऊर्फ अन्य संजय माने (१९), अभिषेक नितीन धोत्रे (१९), प्रीतम ऊर्फ अर्पण राजू सोरोदे उर्फ धोत्रे (१८), गौरव प्रमोद घाडगे (२०) आणि रतन ऊर्फ रोहित मोहन वाघमारे (२३, सर्व रा. कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. कौटुंबिक वादातूनच हा खून केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की स्वप्नील कांबळे हा कर्नाळ (ता. मिरज) येथे राहण्यास आहे. शेअर मार्केट संबंधितीची कामे करतो. काल सायंकाळी संशियत हल्लेखोर प्रणव माने आणि स्वप्नील यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर वाद मिटला. स्वप्नील कर्नाळमधून सांगलीत जेवण आणण्यासाठी मित्रासोबत दुचाकीवरून आला. जेवण घेऊन तो घरी परतला. कामानिमित्त पावणेनऊच्या सुमारास तो पुन्हा घरातून बाहेर पडला. त्यावेळी संशयित माने याने साथीदारांना बोलावून घेतले होते. त्यांनी रात्री पावणेनऊच्या सुमारास भोरा म्हसोबा मंदिराजवळ स्वप्नील याला गाठले. त्याठिकाणी पुन्हा बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी धारदार शस्त्राने स्वप्नील याच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. छातीवर, डोक्‍यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर स्वप्नील हा रक्ताच्या धारोळ्यात पडला. हल्लेखोर पसार झाला. उपचारापूर्वीच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

दरम्यान, पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने सहा जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलिस संदीप मोरे, महेश जाधव, कपील साळुंखे, सचिन मोरे यांचा कारवाईत सहभाग होता. 

मावस भावाचा सहभाग 

प्रणव माने आणि अनिरुद्ध माने हे दोघेही मावस भाऊ आहेत. वाद झाल्यानंतर प्रणवने अनिरुद्धला सारी माहिती दिली. त्यानंतर अनिरुद्ध साथीदारांसह कर्नाळमधील भोरा म्हसोबा मंदिराजवळ आला. साऱ्यांनी मिळून स्वप्नीलवर हल्ला केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर–इचलकरंजी महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, निवडणूकची रणधुमाळी सुरू

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Putrda Ekadashi 2025: वर्षाच्या शेवटच्या एकादशीला, 'या' राशीच्या लोकांचे भाग्य होईल उज्वल, सुखसोयी वाढतील

Kolhapur Crime News : हुपरीत मुलानेच आई-वडिलांचा खून करण्याचं खर कारण आलं समोर, पहाटे पाणी भरत असलेल्या निरागस आईच्या गळ्यावर काच मारली अन्

SCROLL FOR NEXT