crime fail agent one because spreading rumors from social media islampur
crime fail agent one because spreading rumors from social media islampur  
पश्चिम महाराष्ट्र

सोशल मीडियावर अफवा पसविणे त्याला चांगलेच महागात पडले 

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : सोशल मीडियावरून अफवा पसरवून जनतेच्या मनात गैरसमज निर्माण केल्याप्रकरणी येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अमित बजरंग कदम असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. इस्लामपूर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे.

याबाबत अधिक माहीत अशी, 'सांगली जिल्हा बांधकाम कामगार' या व्हाट्स ग्रुपवर अमित याने आक्षेपार्ह संदेश व्हायरल केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. इस्लामपूर येथील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या कुटुंबाला हजवरून कोणत्या बड्या नेत्याने आणले याची न्यायालयीन चौकशी करावी अशी दबक्या आवाजात मागणी असल्याचा मजकूर त्याने व्हाट्सअप्प ग्रुपवरून व्हायरल केला होता. ही खोटी अफवा पसरवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याची दखल घेत त्याच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, जिल्हाधिकारी आदेशाचा भंग, अफवा पसरवणे या कायद्यांर्तगत गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद भरते यांच्याकडे तपास आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश आहे का? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यातील मुख्य सूत्रधार लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT