Crime news about Use of pornographic emoji 
पश्चिम महाराष्ट्र

अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलेची संघटनेवर निवड झाल्यानंतर अभिनंदनाची पोस्ट फेसबुकवर पोस्ट टाकली होती. एकाने उत्साही फेसबुक फ्रेंडने त्या महिलेला शुभेच्छा देताना अश्‍लील इमोजींचा वापर केला. या प्रकरणात धनराज भानुदास शिंदे (वय 56, रा. पतंजली मॉलच्या मागे, जुळे सोलापूर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा विजापूर नाका पोलिसात दाखल करण्यात आला आहे. 

कॉमेंटमध्ये अश्‍लील इमोजी
विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने आपल्या फेसबुक अकाउंटवर संघटनेवर पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र धनराज शिंदे या फेसबुक फ्रेंडने कॉमेंटमध्ये अश्‍लील इमोजी टाकून शुभेच्छा दिल्याचे दिसून आले. याप्रकरणात त्या महिलेच्या फिर्यादीनंतर आरोपी धनराज शिंदे याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा : रेल्वे रुळाजवळ सापडला स्वंयसेवकाचा मृतदेह

ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी बाप-लेकीस पोलिस कोठडी 
क्राउंडफिंच सायबर नेटिक्‍स प्रायव्हेट लिमिटेड, जयपूर या कंपनीचे मालक मनीषकुमार नरेंद्रपाल कक्‍कर व नरेंद्रपाल पृथ्वीराज कक्‍कर यांनी विश्‍वासात घेऊन स्वराज्य पे डॉट कॉम या नावाने डोमेन देऊन सोलापुरातील सुनील शिवाजी पवार (रा. हनुमाननगर, भवानी पेठ) यांची सात लाख 99 हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी आरोपींना न्यायदंडाधिकारी एम. एम. बावरे यांनी 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana: साखरपुड्याची अंगठी गायब अन्...; पलाश मुच्छलसोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाची पहिली पोस्ट, म्हणाली...

Sangli Healthcare Services : जिल्हा नियोजन निधीची मोठी मदत; सांगली-मिरजमध्ये सरकारी आरोग्यसेवेचे ‘मॉडर्न रूप’ MRI, CT, OT सर्व सुविधा एकाच छताखाली!

Marathi Breaking News LIVE: - रविवार मेगा ब्लॉक राहणार नाही

Sangli District Bank : कर्जमाफीच्या घोषणेनंतर जिल्ह्यात पीक कर्ज वसुली ठप्प; अडीच हजार कोटींच्या थकबाकीत अडकलेली जिल्हा बँक आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

अक्षय-सलमानसोबत केलं काम पण आईसाठी करिअरला मारली लाथ; रियल लाइफ श्रावण बाळ झालेल्या या अभिनेत्याला ओळखलंत?

SCROLL FOR NEXT