Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज पुन्हा हादरलं! पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून, तर उसन्या पैशावरुन भाजीविक्रेत्याला भोसकलं

जिल्ह्यात खून, खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोड्यासह गुन्ह्यांची गेल्या महिनाभरापासून मालिका सुरूच आहे.

सकाळ डिजिटल टीम

मृत कुंभार यांच्याकडून संशयित जाधवने दोन हजार रुपये उसने घेतले होते. काल रात्री पैशांची मागणी केल्याने त्याचा राग अनावर झाला. त्यातून त्याने चाकूने हल्ला केला.

सांगली शहरासह जिल्ह्यात खून, खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोड्यासह गुन्ह्यांची गेल्या महिनाभरापासून मालिका सुरूच आहे. सोमवारी (ता. १९) मध्यरात्री मिरज तालुक्यातील (Miraj) दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. मिरज पूर्व भागातील बेडग येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून झाला; तर पश्‍चिम भागातील कसबे डिग्रज येथे भाजीविक्रेत्याला भोसकण्यात आले.

कसबे डिग्रज येथे भाजीविक्रेत्याला भोसकले

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील भाजीविक्रेत्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. पांडुरंग रघुनाथ कुंभार (वय ३२, रा. मारुती मंदिराजवळ, कसबे डिग्रज) असे मृताचे नाव आहे. मित्राने उसने घेतलेले दोन हजार रुपये परत मागितल्याने काल (ता. १९) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली.

सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या (Sangli Rural Police) पथकाने संशयितास हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथून चार तासांत जेरबंद केले. श्रीधर ऊर्फ चेंग्या जगन्नाथ जाधव (कसबे डिग्रज) असे त्याचे नाव आहे. मृत पांडुरंग कुंभार यांचे भाऊ बालमुकुंद कुंभार यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी माहिती दिली, की पांडुरंग कुंभार हे कसबे डिग्रज येथील मारुती मंदिराजवळ कुटुंबासह राहत होते. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. संशयित श्रीधर जाधव हा कुंभार यांचा मित्र. तो एका फौंड्रीत कामगार म्हणून काम करतो. कुंभार यांनी त्याला काही दिवसांपूर्वी दोन हजार रुपये उसने दिले होते.

काल रात्री अकरा ते सव्वाअकराच्या सुमारास दोघे गावातील हॉटेल शिलेदार येथे भेटले. कुंभार यांनी उसन्या पैशांची मागणी केली. त्याचा जाधवला राग आला. दोघांत बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यावर जाधवने कुंभार यांच्या पोटात चाकूने वार केला. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, संशयित श्रीधर जाधवने घटनेनंतर पळ काढला. ग्रामीण पोलिसांनी पथके रवाना केली. त्यांना संशयित हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे असल्याची माहिती मिळाली. तातडीने पहाटे चारच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संतोष माने, मेघराज रूपनर, सुनील कदम, विष्णू काळे, तानाजी वंजारी, बंडू पवार, मनीषा कोरे यांनी कारवाईत भाग घेतला होता.

क्षुल्लक कारण अन् राग अनावर

मृत कुंभार यांच्याकडून संशयित जाधवने दोन हजार रुपये उसने घेतले होते. काल रात्री पैशांची मागणी केल्याने त्याचा राग अनावर झाला. त्यातून त्याने चाकूने हल्ला केला. दोन हजारांचे क्षुल्लक कारण जीवघेणे ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूर्ववैमनस्यातून बेडगला चुलत भावाला मारले

मिरज : बेडग (ता. मिरज) येथील बेडग-मल्लेवाडी रस्त्यावरील शेळके वस्तीवर पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचाच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली. खुनानंतर संशयित कुऱ्हाडीसह मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. रामचंद्र शंकर खरात (बेडग) असे मृताचे, तर सचिन बबन खरात (बेडग) असे संशयित चुलत भावाचे नाव आहे.

या प्रकरणी मृत रामचंद्र खरात यांचे पुत्र आकाश खरात यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामचंद्र खरात व सचिन खरात हे नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. बेडगेतील मल्लेवाडी रस्त्यावरील शेळके वस्ती परिसरात त्यांची शेतात शेजारी घरे आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहे.

वादाचे पर्यवसान काल (ता. १९) रात्री आठच्या सुमारास हाणामारीत झाले. दरम्यान, आज घराकडे येण्याच्या रस्त्यावर सचिन खरातने रामचंद्र खरात यांच्या डोक्यात, मानेवर व पाठीवर वार करून त्यांचा खून केला. सचिन हा रामचंद्र यांना व कुटुंबीयांना पूर्वीपासून शिवीगाळ करीत होता. याआधी आकाश खरात यांच्या पत्नीने सचिनविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून दोन कुटुंबांत धुसफूस सुरूच होती.

त्यावरूनच सायंकाळी साडेसातच्या सुमारास घटनास्थळी सचिन खरात व रामचंद्र खरात यांचा वाद झाला. सचिनने रामचंद्र यांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याने सचिनने डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने वार करून रामचंद्र यांचा खून केला. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, सचिन खरातला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT