Criminal fled against soon who does not support his parents  
पश्चिम महाराष्ट्र

वयोवृद्ध आई-वडिलांना त्रास देणे मुलाला पडले महागात 

संतोष कणसे

कडेगाव (जि. सांगली) : स्वतःच्या वयोवृद्ध व अंध आई वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देवून त्यांना घरात राहू दिले जात नाही. तसेच शिवीगाळ करुन मानसिक व शारिरीक छळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. याबाबत आई वडिलांनी स्वतःचा मुलगा व सुनेविरुद्ध कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,  येथील खुदबुददीन मक्तुम काझी (वय-68) हे येथील  शिवप्रभू शाळेजवळ स्वतःच्या मालकीच्या घरात पत्नी  व मुलगा शफीउल्ला खुदबुद्दीन काझी व सून नफिसा शफीउल्ला काझी यांचे सोबत राहत होते. तर खुदबुद्दीन हे वयोवृद्ध असून अंधही आहे. तसेच त्यांची पत्नी ही वयोवृद्ध आहेत. अशा वार्धक्याच्यावेळी त्यांना स्वतःच्या घरी राहणे गरजेचे आहे. परंतु त्यांचा मुलगा शफीउल्ला व सून नफिसा यांनी 2014 पासून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना घरामध्ये राहणेची नितांत गरज असताना मुलगा व सून हे दोघे त्यांना घरी राहू देत नाहीत तसेच त्यांचा कोणत्याही प्रकारचा योग्य रितीने सांभाळ करत नाहीत. त्यांना मानसिक व शारीरीक त्रास देत आहेत. खुदबुद्दीन पत्नीसह त्यांच्या मुलीकडे राहत आहेत. तरीही मुलगा शफीउल्ला व सून नफिसा हे खुदबुद्दीन व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करुन त्रास देत आहेत.

शेवटी त्रासाला कंटाळून खुदबुद्दीन यांनी मुलगा शफिउल्ला खुदबुददीन काझी व सुन नफिसा शफिउल्ला काझी यांच्याविरुध्द कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये शफीउल्ला व नफिसा काझी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विपीन हसबनिस करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

Latest Marathi News Live Update : डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT