sangli crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

मोठी बातमी - गुंड तुकाराम मोटेचा सांगलीत खून

काल संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला.

सकाळ वृत्तसेवा

काल संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला.

सांगली - संजयनगर येथील गुंड तुकाराम सुभाष मोटे (27) याचा किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. संजयनगर पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, तुकाराम मोटे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही म्हणून त्याने महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करुन मारहाण केली होती. तसेच पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता.

काल संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला. त्यातून हाणामारी झाली. तेव्हा तुकारामला चाकूने भोसकण्यात आले. तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे तुकाराम मृत झाला. काही वेळातच संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच सहायक निरिक्षक संजय क्षीरसागर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या नेमक्या कारणाबाबत तपास सुरु आहे. सायंकाळपर्यंत खुनाचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT