Paschim maharashtra  sakal
पश्चिम महाराष्ट्र

हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम

अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : हालसिद्धनाथ महाराज की जय, चांगभलं च्या जयघोषात कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गुरुवारी कुर्ली, आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणुकीने खडक मंदिरात आणली. तेथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत कर बांधली.

नियमित सकाळी, सायंकाळी सात वाजता आरती व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दररोज रात्री ढोल जागर (वालंग), पहाटे पालखी प्रदर्शना काढली. शनिवारी (ता. 23) पहाटे भगवान ढोणे यांची पहिली भाकणूक झाली. या भाकणुकीत भगवान ढोणे यांनी, देशात समान नागरी कायदा येईल, गोरगरीब जनता सुखी आनंदी व समाधानी राहील, जगात तापमानाचा धोका वाढत जाईल, जंगलात आग लागेल, जंगल नष्ट होतील, वन्य जीवन व वनस्पती औषध पृथ्वीवरून नष्ट पावतील, पावसाअभावी पेरणी पाण्याचा ऋतुमान बदलून जाईल अशी नवीन भाकिते केली.

रविवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी सात वाजता मानकरी, पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती करून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांनी दंडवत घातले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी आप्पाचीवाडी, कुर्ली येथील भाविकांनी गर्दी केली होती.

मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस फौजफाटा तैनात केला होता. प्रशासनाने यात्रा बंद म्हणून सांगितल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुकाने लावली नव्हती. भाविक दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. पोलिस प्रशासनासह अन्य कर्मचाऱ्यांना व भाविकांना कल्लाप्पांना पत्रावळे यांच्यातर्फे चहा, नाश्ता, जेवण व महाप्रसादाची सोय केली होती. सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य सेविका अश्विनी पाटील काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT