Crush-wash sand as an alternative to natural sand; Brass arrives at four hundred per day 
पश्चिम महाराष्ट्र

नैसर्गिक वाळूला पर्याय क्रश-वॉश सॅंड; दररोज चारशेंवर ब्रासची आवक

जयसिंग कुंभार

सांगली ः नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून गेल्या चार ते पाच वर्षांत क्रश सॅंड (दगडांपासून बनवलेल्या कृत्रिम वाळू) आणि आता वॉश सॅंडने (दगडापासून धूळविरहित धुतलेली वाळू) जागा घेतल्याचे चित्र आहे. आज शहर व परिसरातील 95 टक्के बांधकामे याच वाळूपासून होत आहेत. त्यामुळे आता नैसर्गिक वाळू म्हणजे श्रीमंताची चैन झाली आहे. जिल्ह्यात सुमारे चारशे ते पाचशे ब्रास वाळूची आवक जिल्हा व परिसरातील कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पांमधून होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. 

वारेमाप वाळू उपशाने गेल्या दहा वर्षांत वाळूची मोठी टंचाई निर्माण झाली. 2016 पासून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वाळू उपशांवर निर्बंध आणले. अनेक अटी नियमांमधून वाळू लिलाव काढणे म्हणजेच प्रशासनासाठी मोठे आव्हानच आहे. बारमाही नद्यांमधूनही बोटीद्वारे उपसाही वारेमाप झाल्याने तिथेही वाळू उरलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत नैसर्गिक वाळूला सोन्याचा भाव आला आहे. भीमा नदीतून येणारी बेगमपूर वाळूचा दर सध्या सांगली प्रति ब्रासचा तेरा ते चौदा हजारांवर पोहोचला आहे. मागील चार वर्षे जवळपास हाच दर आहे. 

अशा परिस्थितीत नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून सुरवातीच्या काळात क्रश सॅंडचा वापर सुरू झाला. त्याबद्दल सुरवातीला असलेल्या शंका-कुशंका आता निवळल्या असून, आता या कृत्रिम वाळूचा सर्रास वापर सुरू झाला आहे. सांगली व सीमावर्ती जयसिंगपूर, शिरोळ परिसरात अशा सहा नवतंत्रज्ञानाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामधून सरासरी दररोज साठ ते सत्तर ब्रास वॉश सॅंड बाहेर पडत आहे. सांगली, मिरज, जयसिंगपूर, कोल्हापूर, इचलकरंजी या शहरी भागातील सर्व बांधकामे आता याच वाळूपासून होत आहेत.

कॉंक्रिटसाठीची वाळू साडेचार हजार, तर गिलाव्यासाठीची वाळू सात ते साडेसात हजार रुपये ब्रासने मिळत आहे. दरातील ही तफावत आणि नैसर्गिक वाळूच्या टंचाईमुळे आता येत्या काही वर्षांत क्रशरमधील क्रश सॅंड आणि वॉश सॅंड हेच फक्त पर्याय असतील. त्यामुळे त्याच्या वापरात यापुढे अधिक अचुकता आणत बांधकाम क्षेत्राला पुढे जावे लागेल. तशी मानसिकता सर्वांचीच झाली आहे. 

मजबुती नैसर्गिक वाळूइतकी

वॉश सॅंड पूर्णतः बेसॉल्ट दगडापासूनची असते. ती पूर्णतः धूळविरहित आहे. तिची मजबुती नैसर्गिक वाळूइतकी किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे. गिलावा किंवा कॉंक्रिटसाठी चांगल्या क्‍युरेटिंगची गरज आहे. सिमेंटमधील प्लाय ऍशचे प्रमाण काय यावरही मजुबती ठरते. केवळ वाळूवर बांधकामाची मंजुरी ठरत नाही. योग्य मजबुतीसाठी सिमेंट, पाणी, खडी आणि सॅंडचे मिक्‍श्चरचे प्रमाण अचूक हवे. दुर्दैवाने त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. 
- प्रसन्न कुलकर्णी, बांधकाम अभियंता 

वॉश सॅंडने बांधकामाचा खर्चही कमी

वॉश सॅंडने नैसर्गिक वाळूला चांगला पर्याय दिला आहे. सांगली-कोल्हापूर परिसरात असे आधुनिक तंत्रज्ञानाचे पाच ते सहा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामधील वॉश सॅंडने बांधकामाचा खर्चही कमी केला आहे. 
- दिग्विजय बोंद्रे, वॉश सॅंड प्रकल्प चालक 

कमी दरात कृत्रिम वाळू उपलब्ध

नैसर्गिक वाळूच्या दरापेक्षा किमान अडीच ते तीन पटीने कमी दरात कृत्रिम वाळू उपलब्ध होत आहे. अपवाद वगळता बहुतेक सर्व बांधकामे आता याच वाळूत होत आहे. त्याची मजबुतीही प्रयोगशाळांमध्ये तपासून घेतली असता, ती नैसर्गिक वाळू इतकीच आहे. क्रश सॅंडमध्ये समुद्राची वाळूही मिक्‍स करून गिलावा अधिक गुळगुळीत केला जात आहे. हे बदल आता सर्वांनी स्वीकारले आहेत. 
- नरसू खोकडे, क्रश सॅंड प्रकल्प चालक 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT