पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपुरात बुधवारपासून जनता कर्फ्यू; व्यवहार राहणार बंद

५ ते ९ मे अखेर जनता कर्फ्यु असेल, असे जाहीर करण्यात आले

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर : नागरिकांना पुरेशी व्यवस्था करण्यासाठी मध्ये एक दिवसाचा वेळ देत शहरात बुधवार (४) पासून कडक जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला. शहरातील रुग्णसंख्या 300 वर गेल्याने पदाधिकारी आणि प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ५ ते ९ मे अखेर हा जनता कर्फ्यु असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पक्षप्रतोद विक्रम पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन रविवारी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत मंगळवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याचे ठरले होते; परंतु आज झालेल्या बैठकीत अचानक लागू न करता नागरिकांना एक दिवसाचा वेळ देऊन बुधवारपासून कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय झाला. ५ ते ९ मे या कालावधीत फक्त मेडिकल व आरोग्य सेवा या नियमावलीचे पालन करून सुरू राहतील. दूध डेअरी व दुध विक्रेते यांना सकाळी १० पर्यंत संकलन व घरपोच वितरणाकरिता मुभा देण्यात आली आहे. शहराच्या सर्व सीमा बंद केल्या जाणार आहेत. अत्यावश्यक कारण व काम असल्याशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

गर्दी उसळली!

रविवारी पालिकेच्या सभेत मंगळवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. कर्फ्युचे स्वरूप काय आणि कसे असेल याबाबत आज तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्याचे ठरले होते, त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी आज बाजारपेठेत सकाळी 7 ते 11 या वेळेत प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. प्रशासनाने उद्याचा (४) एक दिवस दिला आहे. दरम्यान नागरिकांनी गोंधळून न जाता शिस्तीचे पालन करून नियोजन करावे असे आवाहन आजच्या बैठकीत पालिका प्रशासनाने केले आहे.

"शहरातील विविध संघटना, विक्रेते, व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्युचे पालन करावे. रुग्णसंख्या वाढत आहे. आपण काळजी घेतली नाही तर आपल्यावरदेखील वाईट वेळ येऊ शकते. कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, प्रशासनाला सहकार्य करावे."

- अरविंद माळी, मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT