पश्चिम महाराष्ट्र

`या` महापालिकेत कुंपणच खाई शेत... त्याला नाही लाज...!

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : बनावट स्वाक्षरीने सुमारे दोन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सभेत करण्यात आला आणि भ्रष्टाचाराचा आणखीन एक नवीन प्रकार उघडकीस आला. आनंद चंदनशिवे व चेतन नरोटे यांनी केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली.

कुंपणच खाई शेत त्याला नाही लाज
भ्रष्टाचार झाला आहे की नाही हे तपासणीअंती स्पष्ट होईलच. मात्र हा प्रकार करणारे आणि त्यांच्याकडून करून घेणारे दोघेही महापालिकेचे विश्वस्तच आहे. एक लोकनियुक्त तर एक प्रशासन नियुक्त. त्यामुळे कुंपणच खाई शेत त्याला नाही लाज, घरचाच रखवाला वैरी झाला आज याचा अनुभव सभागृहात उपस्थितांना आला. 

भ्रष्टाचाराची कीड
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या यादीत समावेश झालेल्या सोलापूर महापालिकेतील कारभाराला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. भ्रष्टाचाराचा हा पहिलाच प्रकार नाही. खूप प्रकार उघडकीस आले मात्र सक्षम निर्णय घेणारा अधिकारी न लाभल्याने भ्रष्टाचार करणारे मुक्तपणे कार्यरत आहेत. दहा - बारा रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला की त्याला निलंबित करणारे प्रशासन टेबलाखालून लाखोंनी घेणारे, आप्तस्वकीयांची सोय करणाऱ्यांकडेे मात्र पूर्णतः दुर्लक्ष करते. महापालिकेतील अनेक प्रकरणे माध्यमांनी उघडकीस आणली पण समिती नियुक्त करणे इथंपर्यंतच प्रशासनाचे काम राहिले.  

कासवगतीने होतोयं हिशेब क्लिअर
विविध कामांसाठी घेतलेल्या उचल रकमेचा हिशेब देण्यासाठी आता चढाअोढ लागली आहे. मात्र कोट्यवधींची उचल करून फक्त लाखो रुपयांच्या पावत्या दाखल केल्या जात आहेत. सुमारे 116 कोटी रुपयांचा हिशेब न मिळाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने महापालिकेच्या सभेत सर्वच सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब वेळेत न देणे हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे, मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT