mobile 
पश्चिम महाराष्ट्र

मोबाईलवर रोज सरासरी पाच तास; भारतीयांबद्दल "गुगल'चा अहवाल

सकाळवृत्तसेवा

सांगली ः गेले तीन महिने लोक कोरोना संकटामुळे घाबरलेले आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक काळ लॉकडाउनमुळे लोकांना सक्तीने घरीच थांबावे लागले. या काळात मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे, वेळ चांगला जावा, यासाठी लोकांनी मोबाईल, इंटरनेटचा आधार घेतला. बहुतांश वेळ त्यावरच घालवल्याचे अधिकृत आकडेवारीसह आता समोर आले आहे. लॉकडाउनच्या विश्रांतीच्या काळात दररोज सरासरी चार ते पाच तास लोक ऑनलाईन होते, असा अहवाल "गुगल'ने सादर केला आहे. या काळात महिलावर्गाने यू-ट्यूबवर सर्वाधिक "रेसिपी' शोधल्या आणि त्यातही पाणीपुरी कशी बनवावी, हा प्रश्‍न सर्वाधिक वेळा विचारला गेल्याचे अहवालात म्हटले आहे. 


कोरोना लॉकडाउनचा प्रभाव सर्वाधिक एप्रिल महिन्यात जाणवला. मे महिन्यात काही अंशी लोकांना मोकळा श्‍वास घेता आला; मात्र एप्रिलमध्ये लोकांना घराबाहेर पडता आले नाही. या काळातील "गुगल सर्च'चा ट्रेंड लक्षवेधी राहिला. या काळात "निअर मी' म्हणजे "माझ्या जवळचे' या ट्रेंडखाली किराणा दुकाने, मेडिकल, रेशन दुकान शोधली गेली. यू-ट्यूबवर अन्य काळाच्या तुलनेत रेसिपी पाहण्याचे प्रमाण किमान 20 टक्‍क्‍यांनी वाढले, तर त्यात पाणीपुरी या एका पदार्थाचा शोध तब्बल 107 टक्‍क्‍यांनी वाढला. आयुर्वेदिक काढा, घरच्या घरी व्यायाम यावरही लोकांनी बरेच संशोधन केले. या काळात ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे क्‍यूआर कोडने व्यवहाराबाबत माहिती मिळवण्याचे प्रमाण 60 टक्‍क्‍यांनी वाढले. यूपीआय कोडबाबत 55 टक्के शोध वाढला. सुरक्षिततेची काळजी घेताना लोकांनी यूपीआय पिन बदलण्याबाबतची प्रक्रिया समजून घेतली. ते प्रमाण तब्बल 200 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे गुगलच्या या अहवालात म्हटले आहे. 
------------- 
 

काय शोधले सर्वाधिक (अन्य काळाच्या तुलनेत वाढ टक्‍क्‍यांत) 

* उत्तम सिनेमा - 35 टक्के 
* व्यापाराच्या कल्पना ः 45 टक्के 
* वजन घटवावे कसे ः 180 टक्के 
* इंग्रजी शिकायचेय ः 100 टक्के 
* घरात बसून अभ्यास ः 70 टक्के 
* उत्तम तेलगू सिनेमे ः 450 टक्के 
* कार्टून मालिका, सिनेमा ः 60 टक्के 
------------------- 
इथे जास्त वेळ खर्च 

* ऑनलाईन शिकणे ः 85 टक्के वाढ 
* ऑनलाईन शिकवणे ः 148 टक्के वाढ 
* गेम खेळणे ः 128 टक्के वाढ 
* वर्क फ्रॉम होम ः 50 टक्के वाढ 

 

मोबाईल बाजारात खरेदीचा नवा ट्रेंड आम्ही अनुभवत आहोत. मुलांना ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल हवा आहे, अशी मागणी याआधी कधीही नव्हती. जी होती ती हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकी होती. अर्थातच, हॅंडसेटसोबत फोरजी कार्ड आणि इंटरनेट पॅक सारेच आले. 
- अजय नानवाणी, 
मोबाईल शोरूम मालक, सांगली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT