Damage to grapes in attack of pea in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

अबब... 'या' पक्षाने रात्रीत मारला दोन एकर द्राक्षांवर डल्ला...

सकाळ वृत्तसेवा

सलगरे (सांगली) - वटवाघळांच्या हल्ल्यात द्राक्षांचे नुकसान, परिपक्व झालेल्या दोन एकरांतील द्राक्षांवर मारला डल्ला, पूर्व भागातील चाबुकस्वारवाडीतील प्रकार, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत बागायत शेती पुढे नवीन संकट उभारले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की सलगरे, चाबुकस्वारवाडी बेळंकी परिसरात सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे, आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षे विक्री झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्‍टोबर मध्ये छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागेतील द्राक्षांची व्यापाऱ्यांकडून खरेदी-विक्री होत आहे.

रात्री ९ ते १०च्या दरम्यान हल्ला

चाबुकस्वारवाडी येथील बसवराज गुडेंवाडी यांच्या दोन एकर बागेतील परिपक्व झालेली सुपर सोनाका जातीची चांगल्या दर्जाची द्राक्षे व्यापाऱ्यांना १६१रु. दरांने सरसकट विक्री करण्यात आली होती. दोन ओळीतील द्राक्षांची तोडणीही करण्यात आली होती. शेतकरी बसवराज यांना व्यापाऱ्यांने ११००० रुपये इसारत दिली होती, मात्र शिल्लक माल तोडणी करण्यापूर्वी अचानक परिपक्व झालेल्या या द्राक्षावर वटवाघळांच्या समूहाने  दोन ते तीन दिवसांत रात्री ९ते१०च्या दरम्यान हल्ला चढवित सुमारे १८ टन द्राक्षे खाऊन टाकल्याचा अंदाज गुंडेवाडी यांनी व्यक्त केला. बागेमध्ये वटवाघळांनी खाल्लेल्या द्राक्षांचे घड पडल्याचे दिसून आले. दररोज वटवाघळांची संख्या काही कमी होईना. पाचशेहून जास्त वटवाघळांच्या समूहाने द्राक्षे खाण्याचा सपाटा सुरुच ठेवला होता.

अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान

शेतकरी बसवराज  गुडेंवाडी यांनी पक्षी आत बाहेर करू नयेत म्हणून जाळी लावण्याचा निर्णय घेऊन वटवाघळांवर नियंत्रण ठेवता येते का बघितले. एलईडी लाइट, फटाके उडवून ही काही उपयोग होईना म्हणून शेतकरी बसवराज गुडेंवाडी यांनी पक्षी आत बाहेर करू नयेत म्हणून ८० हजार रु.खर्च करून जाळी लावण्याचा निर्णय घेऊन वटवाघळांवर नियंत्रण ठेवता येते का बघितले नंतर १००हून अधिक मोठीच्या मोठी वटवाघळे जाळीमध्ये अडकली होती. धडपड करून ती जाळीमध्येच अडकून मेली. यांमुळे गुडेंवाडी यांच्या दुसऱ्या द्राक्ष बागेचे नुकसान होण्याचे टळले असले तरी, नवीन जाळी खरेदीसह अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
व्यापाऱ्यांने शिल्लक राहिलेला बारीक आणि वटवाघळांनी निम्मा अर्धा खाल्लेला माल नेण्यास नकार दिल्यानंतर बारीक शिल्लक द्राक्षे बेदाणा शेडवर टाकण्यात येत आहेत. 
परिसरातील इतर परिपक्व झालेल्या द्राक्षांवर वटवाघळांनी मोर्चा वळवला असल्याचे दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

याच बागेतील गेल्यावर्षी ३८ टन उत्पादन निघाले होते. यावेळी मात्र फक्त १२ टन २००किलो इतके उत्पादन निघाल्याने वटवाघळांच्या हल्ल्यात सुमारे २६ते२८टन उत्पादन घटल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने वटवाघळांनी नुकसान केलेल्या द्राक्षबागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी. 
- बसवराज गुडेंवाडी, शेतकरी, चाबुकस्वारवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT