Dams filled the Ped area; The water problem is solved 
पश्चिम महाराष्ट्र

पेड परिसरात बंधारे भरले; पाण्याचा प्रश्‍न मिटला

गजानन पाटील

पेड : गेल्या दोन वर्षात झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परिसरात बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. यावर्षी ऊस, गहू यासह अन्य पिके जोमाने डोलत आहेत. 

जलयुक्त शिवार, पाणी आडवा, पाणी जिरवा कार्यक्रम यातून कापूर ओढ्यावर बंधारे बांधले गेले. ते तुडुंब भरले. दोन वर्षांपासून गाव टॅंकरमुक्त झाले. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पिण्याच्या पाण्याची समस्या येते. ती यंदा आली नाही. पेड तलावापासून ते हजारवाडीपर्यंत जवळपास 16 ते 17 लहान मोठे बंधारे बांधले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. 

सलग दोन वर्षे दमदार पावसाने पेडचा तलाव भरून ओसंडून वाहता झाला. सर्व बंधारे तुडुंब भरले. मुबलक प्रमाणात पाणी आले. विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. गहू, हरभरा, ऊस तसेच अन्य पिकांच्या बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी नवीन द्राक्षबागांच्या लागण केली आहे. ओढा पात्रात अजूनही वाहते पाणी आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Guns License : कोल्हापूर जिल्ह्यातील परवानाधारक पाच हजार बंदुका जमा करण्याचे आदेश, काय आहे कारण

Latest Marathi News Live Update : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका आंदोलन

मनसेसोबत युती करणार का? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला, मविआच्या नेत्यांना दिला सल्ला

Sharad Pawar: “कुटुंब वेगळं, राजकारण वेगळं... पार्थ प्रकरणी सुप्रियाचं मत वैयक्तिक"; पुणे जमीन घोटाळ्यावर पवारांची स्पष्ट भूमिका

तुम्हाला काय माहीत नेमकं काय घडलंय? पहिल्यांदाच त्याच्या घटस्फोटाबद्दल बोललेला स्वप्नील जोशी; म्हणाला, 'दोन व्यक्ती वेगळे होतात तेव्हा...

SCROLL FOR NEXT