Holiday Sakal
पश्चिम महाराष्ट्र

दसरा सुट्टीला सुरूवात, विद्यार्थी झाले निवांत

कोरोनाच्या संकटामुळे उशिरा शाळा सुरू झाल्या असल्या तरी सोमवारपासून विद्यार्थ्यांची दसरा सुट्टी सुरू झाली आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव - कोरोनाच्या संकटामुळे उशिरा शाळा सुरू झाल्या असल्या तरी सोमवारपासून विद्यार्थ्यांची दसरा सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक देखील निवांत झाले आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांना वीस तर पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबर पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी दसरा सुट्टीचा अधिक अतिशय कमी असणार असून शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अधिक वेळ मिळावा यासाठी दसऱ्याच्या सुट्टीत कपात करण्यात आली आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी दसऱ्याच्या काळात शाळा सुरू झाल्या होत्या तर यावेळी २३ ऑगस्ट पासून नववी ते दहावी तर सहा ऑगस्ट पासून सहावी ते आठवीच्या शाळा सुरू झाले आहेत. शाळा विलंबाने सुरू झाल्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांना दसरा सुट्टी मिळणार की नाही अशी चर्चा सुरू होती मात्र दरवर्षीप्रमाणे शिक्षण खात्याने दसरा सुट्टी देण्याचा निर्णय घेतला मात्र अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा याकरिता दसरा सुट्टीत कपात करण्यात आली असून शालेय विद्यार्थ्यांना दहा दिवस तर पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सात दिवसांची दसरा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मात्र, सुट्टीच्या काळात सरकारी सुट्ट्या अधिक आहेत. त्यामुळे दसरा सुट्टीचा कालावधी अतिशय कमी असून पदवीपूर्व महाविद्यालयांना सोमवारपासून (ता. १८) पुन्हा सुरुवात होणार आहे तर शालेय विद्यार्थी गुरुवारपासून (ता. २१) विद्यालयांमध्ये परतणार आहेत. दसरा सुट्टीत कपात केल्यामुळे पुढील काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत होणार असून पालक व विद्यार्थ्यांना देखील लवकर शाळा सुरू व्हाव्यात आणि अभ्यासक्रम पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

दसरा सुट्टी झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी देवदर्शन व बाहेर फिरावयास जाण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. तर विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला आहे.

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांना दसरा सुटी देण्यात आली असली तरी या काळात उद्या त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशा सूचना करण्यात आल्या असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना या कालावधीतील अभ्यासक्रम देण्यात आला आहे.

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : गांधी जयंतीपासून रोजगार सेवकाचे कामबंद आंदोलन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT