पश्चिम महाराष्ट्र

स्मार्ट सिटीत मृत प्राण्यांची अवहेलना! 

परशुराम कोकणे

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात कुत्रे, मांजर, गाढवं, डुकरं यासह अन्य मोकाट आणि पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रीय व्यवस्था नाही. महापालिकेच्या कचरा गाडीतूनच नेऊन कचरा डेपो परिसरात अशास्त्रीय पद्धतीने मृत प्राण्यांची विल्हेवाट लावली जात आहे. मुंबई, पुणे आदी शहरांप्रमाणे सोलापुरातही मृत प्राण्यांसाठी विद्युत किंवा गॅस दाहिनी उभारणे आवश्‍यक आहे. 

महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष
दैनंदिन कचऱ्यासह कत्तलखान्यातील घाण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्‍न महापालिकेसमोर आहे. राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वयोमानानुसार, आजारामुळे, रोगामुळे आणि रस्ते अपघातांत कुत्रे, मांजर, डुकरं, गाढवं, गायी आदी प्राण्यांचा मृत्यू होतो. अनेकदा हे मृत प्राणी रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, कचराकुंडी किंवा मोकळ्या मैदानात पडल्याचे दिसून येतात. यामुळे पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. कोणीच लक्ष दिले नाही तर मृतदेहाची हेळसांड होत असल्याचे दिसून येते. परिणामी परिसरात दुर्गंधी सुटून रोगराई पसरते. 


हेही वाचा :  माजी मंत्र्यांच्या मुलीचा छळ! कारण..

या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता
महापालिका प्रशासनाकडे याची तक्रार केल्यानंतर घंटागाडीतून मृत प्राणी नेले जातात; मात्र अनेकदा 24 तास उलटून गेल्यानंतर हे प्राणी तसेच पडून असतात. तुळजापूर रस्त्यालगतच्या कचरा डेपो परिसरात मृत प्राणी खड्ड्यात टाकून विल्हेवाट लावली जाते. तेथे शास्त्रीय पद्धतीने मृत प्राण्यांना दफन केले जात नाही, असे प्राणी प्रेमींचे म्हणणे आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात मृत प्राण्यांसाठी स्वतंत्र विजेवरची किंवा गॅस दाहिनी उभारायला हवी. शहराचा सर्वांगीण विकास करत असताना महापालिका प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी या विषयाकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्‍यकता आहे. 

हेही वाचा : लग्नसोहळा अविस्मरणीय करण्यासाठी..

सोलापूरकर म्हणतात..

सोलापूर स्मार्ट सिटीत प्राण्यांसाठी कोणत्याही प्रकारची योजना दिसत नाही. मोकाट प्राण्यांवर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र समिती असायला हवी. मोकाट फिरणारे कुत्रे, गाढवं, गायी यांचा रोजच रस्त्यावर अपघात होत असतो. अपघातानंतर मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची महापालिकेकडे व्यवस्था नाही. 
- ऍड. स्वप्नाली चालुक्‍य, प्राणीमित्र 

माझ्या प्रभागात आठवड्यात दोन-तीन घटना मोकाट प्राण्यांच्या मृत्यूच्या घडतात. नागरिकांची तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या घंटागाडीला बोलावून मृत प्राणी उचलून नेले जाते. मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. याबाबत महापालिका पदाधिकारी आणि आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येईल. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक 

खड्डा करून चुना किंवा मीठ घालून मृत प्राण्यांचे दफन करायला हवे. प्रत्यक्षात सोलापुरात तसे होताना दिसत नाही. मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांत मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी विद्युत, गॅस दाहिनी आहे. सोलापूर महापालिकेनेही प्राण्यांसाठी अशी व्यवस्था करायला हवी. यामुळे प्राणी पाळणाऱ्यांची सोय होऊ शकेल. 
- डॉ. राकेश चित्तोडा, ऍनिमल राहत 

तक्रार आल्यानंतर घंटागाडीतून मृत प्राणी कचरा डेपो परिसरात नेले जातात. तेथे मृत प्राणी पुरतात. दररोज शहरातून किती मृत प्राणी उचलले जातात याची नोंद नाही. स्वतंत्र व्यवस्था करता येऊ शकते. मृत जनावरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे विचाराधीन आहे. 
- संजय जोगदनकर, मुख्य सफाई अधीक्षक, महापालिका

महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT