Ganpati Visarjan Miravnuk esakal
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक! गणपती विसर्जनावेळी DJ च्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू? मंडळांतील 'ईर्षा' ठरली मृत्यूचं कारण

गणपती विसर्जनावेळी (Ganpati Visarjan Miravnuk) तरुणाचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

पावसेचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात युवा व्यावसायिक म्हणून त्याने लौकिक मिळवला होता.

कवठेएकंद : येथे गणपती विसर्जनावेळी (Ganpati Visarjan Miravnuk) तरुणाचा मृत्यू झाला. कर्णकर्कश आवाजामुळे घटना घडल्याची चर्चा आहे. शेखर सुखदेव पावशे (वय ३२, कवठेएकंद) असे त्याचे नाव आहे. पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही.

दरम्यान, समाज माध्यमांवर कर्ककर्कश आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणांविरोधात टीकेची झोड उठली आहे. पोलिस काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे. येथे काल रात्री अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका झाल्या. मिरवणुकीनिमित्त उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणा लावल्या होत्या. तरुणाई नाचत होती.

काल सायंकाळी सातपासून चौकाचौकांत दणदणाट सुरू होता. विसर्जन मिरवणुकीत पावसेही गेला होता. रात्री बसथांबा चौकात मिरवणुका आल्यानंतर ईर्षा सुरू झाली. धडकी भरवणाऱ्या आवाजामुळे अनेकांना त्रास झाला. अस्वस्थ वाटू लागल्‍यामुळे पावसेला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पावसेचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात युवा व्यावसायिक म्हणून त्याने लौकिक मिळवला होता. काही वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. चार वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी मिरवणुकीतील आवाजावर नियंत्रणासाठी सुरवातीलाच पावले उचलायला हवी होती, अशी चर्चा आहे. आता तरी पोलिसांनी तालुक्यातील कर्णकर्कश आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणेवर कठोर कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT