khasdar  
पश्चिम महाराष्ट्र

केंद्राचा निर्णय....वाढविले खासदारांचे अधिकार 

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असतानाच आता अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने खासदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने दिले आहेत. मात्र, महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर खासदारांचा वॉच राहावा या हेतूने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्याचाही अधिकार

राज्यात दरवर्षी सरासरी 36 हजार रस्ते अपघात होतात. विशेष म्हणजे मागील सहा-सात वर्षांपासून हे प्रमाण जैसे थेच आहे. रस्ते अपघातात दरवर्षी सरासरी 18 हजार जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे आहे. दुसरीकडे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाणही दरवर्षी एक कोटींहून अधिक असून त्यांच्याकडून सरासरी 230 कोटींचा दंड वसूल केला जातो. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीद्वारे उपाययोजना केल्या जातात. या समितीची दरमहा बैठकही होते परंतु, बेशिस्त वाहतूक आणि अपघात व मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. तरीही वाढते अपघात अन्‌ मृत्यू कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने खासदारांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. रस्ते अपघात कमी करण्याच्या बाबीकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्याचाही अधिकार केंद्राने खासदारांना दिले आहेत. जिल्ह्यातील अपघात व मृत्यूची माहिती खासदारांची समिती तीन महिन्यातून एकदा घेणार असून जिल्हाधिकारी या नव्या समितीचे सचिव असणार आहेत. 

नव्या समितीचे असे राहणार कामकाज 

  • जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीतील विषय अन्‌ उपाययोजनांची माहिती घेणे 
  • जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने तीन महिन्यात केलेल्या उपाययोजनांची पडताळणी करणे 
  • नव्या समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ खासदार तर जिल्हाधिकारी असणार सदस्य सचिव 
  • अपघात कमी करण्याचे व शाळा-महाविद्यालयात जनजागृती होतेय का याची चाचपणी करणे 
  • रस्ते अपघात कमी करण्यासाठी गांभीर्य नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT