This decision has been taken to choke up the sewege in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत गटारींचे चोकअप काढण्यासाठी हा घेतलाय निर्णय

सकाळवृत्तसेवा

सांगली : गेल्या वर्षी महापुरानंतर शहरातील गटारींचे चोकअप काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जेटींग मशिनचा फायदा झाला होता. आता अशीच मशिन भाड्याने घेऊन महापालिका क्षेत्रातील भूमिगत गटारींचे चोकअप काढणे, पाईपलाईनची दैनंदिन देखभाल करणे असा ठराव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

मात्र प्रतीदिन 27 हजार 500 रुपये भाड्याने वर्षाला 71 लाख 50 हजार रुपये देऊन मशिन घेण्यात येणार आहे. हे मशिन दोन वर्षासाठी घेण्याचा प्रस्ताव आहे. पण कॉंग्रेस सदस्यांनी त्याला विरोध केल्याने आता किती वर्षासाठी मशिन भाड्याने घ्यायचे याचा निर्णय आयुक्तांवर सोपवण्यात आला आहे. 

महापालिकेची स्थायी समिती सभा आज वसंतदादा सभागृहात कोरोनाचे नियम पाळून घेण्यात आली. सभापती संदीप आवटी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील भूमिगत गटार योजनेच्या पाईपलाईनच्या दैनंदिन देखभाल व चोकअप काढण्यासाठी सक्‍शन कम जेटींग मशिन विथ वॉटर रिसायक्‍लर मशीन भाड्याने घेण्याचा विषय होता. आयर्न पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीचे मशिन 27 हजार 500 रुपये प्रती दिन आठ तासांच्या शिफ्टप्रमाणे घेण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी महापुरानंतर शहरातील तुंबलेली गटारे साफ करुन स्वच्छता करण्याकामी मुंबई महापालिकेच्या सक्‍शन कम जेटींग मशिनचा उपयोग झाला होता. या मशिनमुळे शहराची वेगाने स्वच्छता झाली होती. त्यामुळे हे मशीन भाड्याने घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे.  आयर्न पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीचे मशीन दोन वर्षांसाठी भाड्याने घेण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी प्रती दिन 27 हजार 500 रुपये भाड्या प्रमाणे वर्षातील किमान 260 दिवस शिफ्ट धरुन प्रती वर्ष 71 लाख 50 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे. म्हणजे दोन वर्षाला एक कोटी 43 लाख रुपये इतके भाडे द्यावे लागणार आहे. 

एकूणच या विषयावरुन महापालिकेला 260 दिवस या मशिनला काम देता येणार आहे का? नसल्यास करार केल्यावर पैसे फुकट द्यायचे का? तसेच महापालिकेने स्वत:च मशीन का खरेदी करु नये? असे प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केले. यावर अधिकाऱ्यांनी, सदर मशीनची किंमत साडे चार कोटींच्या पुढे आहे. ते महापालिकेला परवडणार नाही. तसेच या मशिनवर काम करण्यासाठी लागणारे प्रशिक्षित तंत्रज्ञ, ऑपरेटर आपल्याकडे नाहीत. अशी कारणे सांगून दोन वर्षांनी पुन्हा भाडे कराराचे नूतनीकरण करावे लागेल असे सदस्यांसमोर स्पष्ट केले. 

स्वत:च मशिन खरेदी करावे 
महागड्या भाड्याने मशिन घेण्यापेक्षा स्वत:च महापालिकेने मशिन खरेदी करावे. कंपनीमार्फत तीन महिन्यांमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. त्यामुळे महापालिकेची कायमची मशिन होईल असा सदस्यांनी आग्रह धरला. सध्याचा पावसाळा लक्षात घेता एक वर्षासाठी मशिन घ्यावे अशी मागणी कॉंग्रेस सदस्यांनी केली. यावर मशिन किती कालावधीसाठी घ्यायची याचा निर्णय आयुक्तांनी घ्यावा असे ठरले. 

आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय
जेटींग मशिनचे भाडे, त्याची किंमत यावरुन सभेत सदस्यांनी चांगली चर्चा केली. पण मशिनची किंमत लक्षात घेता भाड्याने मशिन सध्या घेतली आहे. ती एक की दोन किती वर्षासाठी घ्यायची, तसेच इतर गोष्टींबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. 
- संदीप आवटी, सभापती स्थायी समिती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT