Demand for Karnataka buses from the devotees of Maharashtra has increased belgum news 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातून कर्नाटक बसला का वाढलीय मागणी...?

सकाळ वृत्तसेवा

निपाणी - फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी निपाणी आगारातून कर्नाटक बसेसना महाराष्ट्रातील भाविकांकडून मागणी वाढली आहे. मंगळवार (ता. २८) अखेर सौंदत्ती यात्रेसाठी ५० बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 
तसेच अद्याप कर्नाटक सीमाभागातील ग्रामीण भागातील यात्रा पुढील महिन्यात जाणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर निपाणी आगारातून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यात्रेमुळे आगारात भाविकांना बस आरक्षणासाठी विशेष सोय व माहिती कक्ष उघडण्यात आला आहे. त्याचा सर्वांना लाभ 
होत आहे. 

भाविक निपाणी आगारातील बसला देत आहेत प्राधान्य

आरक्षित केलेल्या बससह येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आगारातून दररोज बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दररोज आरक्षणाव्यतिरिक्त भाविकांना ये-जा करणे शक्‍य झाले आहे. यंदाही सौंदत्तीला आरक्षित बसचे दर आणि अन्य माहिती दिली जात आहे. विशेष करून महाराष्ट्रातील भाविक निपाणी आगारातील बसला प्राधान्य देत आहेत. येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बसचे आरक्षण होऊन यात्रेसाठी भाविक जाणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर विशेष चालक-वाहक व्यवस्था केली 
जात आहे.

सौंदत्ती यात्रेसाठी महाराष्ट्रातील भाविकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बसचे आरक्षणही वाढले आहे. त्यामुळे यंदा सौंदत्ती यात्रेतून उद्दिष्टपूर्ती होण्याची शक्‍यता आहे. भाविकांनाही चांगली सोय दिली जाणार आहे.
- मंजूनाथ हडपद
आगार व्यवस्थापक, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT