Demand for settlement of open liquor sellers in nerale sangli 
पश्चिम महाराष्ट्र

ती म्हणते, 'आधीच कोरोना मुळे संसाराची वाट लागलीय अन् त्यांना दारू कोठून मिळाली?'

सकाळवृत्तसेवा

नेर्ले (सांगली) -  वेळ सकाळी ९ ची... ती म्हणते," त्यांना दारू कोठून मिळाली? आधीच कोरोना मुळे संसाराची वाट लागलीय ! त्यात दररोज दारू पिऊन नवरा येतोय.घरात मुलांबाळाना खायला काय घालायचं? सगळं बंद असताना त्यांना दारू मिळतेच कशी?'' या प्रश्नाने ती गांगरून गेली आहे.दारू विकणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्याचे कधीच बरे होणार नाही. असा शिव्या शाप देत ती भ्रष्ट यंत्रनेचे वाभाडे काढत होती. यावरून लॉक डाऊन मध्ये सुद्धा अवैधरीत्या ६० रुपयांची दारू आता चोरून ३०० रुपयांना मिळत आहे.या मिळणाऱ्या दारूमुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

यांना कोणाचे अभय आहे ?

ग्रामीण भागात युवकांना दारू गुटखा मावा यांचे व्यसन आहे.ज्या ठिकाणी मिळेल तेथून दारू, गुटखा मिळवण्याची धडपड व्यसनाधीन युवकांच्या मध्ये सुरू आहे.नेर्ले परिसरातील काही गावात या देशी दारूचे बॉक्स आणून चढ्या दराने व छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे.कोरोनामुळे आधीच अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दारू विकून आपले संसार थाटणाऱ्या या दारू विक्रेत्यांना व अवैध धंदे करणाऱ्यांना कोणाचे अभय आहे? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. ही गावे महामार्गास लागून असल्यामुळे दारू आणि गुटखा विक्री जोमात सुरू आहे. प्रशासन मात्र कोमात गेल्याचे चित्र आहे. तोंडात गुटखा व खिशात देशी दारूच्या बाटल्या दिसत आहेत. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. लोकांना घरात बसायला सांगितले जात आहे तर दुसरीकडे दारू आणि गुटखा खुलेआम विकला जातोय.

एका गावात तर दारू विक्री साठी बॉक्स आणले जात आहेत.कोरोनाच्या लढाई बरोबर अवैध धंद्यांचे उच्चाटन होऊ नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तळीरामांना दारू मिळतेय पण दारुड्याच्या घरात मात्र महिलांचे हाल होत आहे. याकडे कोण लक्ष देणार? हा प्रश्न निरुत्तर करणारा आहे. खुलेआम दारू विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.एकीकडे कोरोना शी लढा देताना दुसरीकडे अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी कोणाचे हात आहेत याची चर्चा मात्र जोरात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT