Department of Education new circulars for class x exam belgaum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - दहावी परिक्षेसाठी आली नवीन नियमावली....

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनापासुन सावधानता बाळगण्यासाठी शिक्षण खात्याने उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली असून दहावी परीक्षेसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार सर्दी, ताप, खोकला आदी आजार झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी स्वतंत्र खोलीत बसविण्यात येणार आहे तसेच परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना मास्क वापरण्याची परवानगी देण्यात आली असून परीक्षा काळात एका खोलीत 15 ते 20  विध्यार्थीच बसवा अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

पहिली ते सहावी पर्यंतची परीक्षा रद्द
कोरोनापासून खबरदारी घेण्यासाठी शिक्षण खात्याने पहिली ते सहावी पर्यंतची परीक्षा रद्द केली आहे तर सातवी ते नववीच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र दहावीच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रका प्रमाणे 27 मार्च ते 9 एप्रिल पर्यंत होणार आहे. मात्र कोरोनामुळे विविध प्रकारच्या खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून दहावी परीक्षेवेळी जे विद्यार्थी मास्क घालून परीक्षा केंद्रावर येतील त्यांना परीक्षा केंद्रावर जाण्याची मुभा देण्यात यावी अशी सूचना परीक्षा केंद्र प्रमुखांना करण्यात आली आहे.

आजारी विध्यार्थी बसणार स्वतंत्र खोलीत

तसेच ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, ताप आदी आजार असतील तर त्यांना  वेगळ्या खोलीत बसून पेपर लिहायला देण्याची सूचना करण्यात आली असून ज्या विध्यार्थ्यांना सॅनिटाइजर्स घेऊन यायचे असतील तर ते विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. परीक्षा सुरळीतरित्या पार पडावी यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत त्यानुसार शिक्षण खात्याने परीक्षा काळात नवीन नियमावली तयारी करण्यात आली आहे. याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक ती माहिती द्यावी असे सुचविण्यात आले आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दहावी परीक्षेसाठी सावधानता बाळगण्यात येत आहे याबाबत विद्यार्थ्यांना लवकरच माहिती देण्यात येणार आहे 
ए बी पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

४०० धावांचा विक्रम का मोडला नाही? Wiaan Mulderने सांगितली मन जिंकणारी गोष्ट; म्हणाला, ब्रायन लारा..

Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Kolhapur : शिवीगाळ केली म्हणून सात नशेखोरांनी मित्राला मारलं, मृतदेह घाटावर फेकला; तीन अल्पवयीन, फिर्यादित मिळाली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT