Despite the loss, ST service continues 
पश्चिम महाराष्ट्र

तोटा सहन करूनही "ति'ची सेवा सुरूच

दौलत झावरे

नगर : बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्‍यानुसार एसटीचा अविरतपणे कारभार सुरू आहे. ब्रीदवाक्‍याला धक्का लागू नये, म्हणून अहमदनगर विभागाने 100 बसच्या फेऱ्या उत्पन्न कमी येऊनही सुरू ठेवलेल्या आहेत. प्रवाशांनी एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी खासगीचा प्रवास टाळून एसटीने करावा; अन्यथा आम्हाला तोट्यातील बसच्या फेऱ्या बंद कराव्या लागतील, अशी म्हणण्याची वेळ आता एसटीवर आली आहे. 

जिल्ह्यात 1602 गावे असून, एसटीचे दोन विभागीय कार्यशाळा व अकरा बसस्थानकांच्या माध्यमातून 1277 गावांमध्ये एसटी अद्यापपर्यंत पोचलेली आहे. जिल्ह्यासह परजिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण 787 बस उपलब्ध आहेत. या बसच्या दिवसरात्र अशा फेऱ्या सुरू आहेत. त्यातील 100 फेऱ्या सध्या कमी उत्पन्न मिळणाऱ्या आहेत. त्या बंद कराव्यात की चालू ठेवाव्यात, याच मानसिकतेत सध्या अधिकारी वर्ग आहे. 

गर्दीच्या हंगामात एसटी प्रशासनाकडून काही वेळा बसच्या फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. तसे केल्यानंतर संबंधित गावातील प्रवाशांकडून प्रशासननाला बस सुरू करण्याचे पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. एसटी प्रशासनाकडूनही त्यांना बस तोट्यात आहेत, नफ्यात येण्यासाठी ग्रामस्थांना एसटीने प्रवास करण्यास आवाहन करावे, असे सांगितले जात आहे. त्यावर एसटीनेच प्रवास केला जाईल अशी चर्चा होऊनही परिस्थिती जैसे थेच राहत आहे. तोटा सहन करूनही एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना सेवा दिली जात असली, तरी प्रवाशांकडून खासगीचा वापर केला जात आहे. खासगीचा विस्तार एसटीच्या मुळावर उठलेला आहे. 

भोजदरीकरांचा आदर्श घ्या 
भोजदरी (ता. संगमनेर) गावात जेव्हा बस सुरू झाली, तेव्हा ती बस कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी रोजच बसच्या माध्यमातून प्रवास केला. कामे नसतानाही अनेकजण टप्प्या-टप्प्याने आपल्या नातलगांकडे जाऊन रात्री पुन्हा त्याच बसने येत होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ही बस आजही सुरू असून, भोजदरीतील ग्रामस्थ नेहमीच या बसच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत.

एसटीने प्रवास करणे सुखकर 
प्रवाशांसाठी आमच्याकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. प्रवाशांनी खासगीने प्रवास टाळून एसटीने प्रवास करणे महत्त्वाचे आहे. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, अहमदनगर विभाग  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT