Devendra Fadnavis worshiped shanidev in shinganapur 
पश्चिम महाराष्ट्र

शनिदेवा हात जोडीतो!

सकाळ वृत्तसेवा

सोनई (नेवासे) : माजी मुख्यमंत्री, तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.11) रात्री दहा वाजता शनिशिंगणापूरला भेट देऊन स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले.

फडणवीस यांनी अभिषेक केल्यानंतर पुरोहित विशाल कुलकर्णी यांनी त्यांना शनिमूर्तीला तेल अर्पण करण्यासाठी चौथऱ्यावर जाण्याची विनंती केली असता, "शनिदेवा हात जोडीतो' असे म्हणत त्यांनी इतर भक्तांप्रमाणे चौथऱ्याखालूनच दर्शन घेतले. स्वयंभू शनिमूर्तीच्या या भूमित मोठी ऊर्जा असून, दर्शनाने मनाला बरं वाटलं, असा अभिप्राय फडणवीस यांनी व्यक्त केला. 

शनिमूर्तीचे चौथऱ्याखालूनच दर्शन

औरंगाबादहून पुण्याकडे जाताना फडणवीस यांनी अचानक वेगळी वाट निवडली. कुणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता, शनिवारी रात्री साडे नऊ वाजता ते शनिशिंगणापूरला आले. उदासी महाराज मठात सुखशांतीसाठी नियमीत होणारा अभिषेक केला. तसेच स्वयंभू शनिमूर्तीचे चौथऱ्याखालूनच दर्शन घेतले. 

शनैश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार

शनैश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे कोषाध्यक्ष योगेश बानकर व विश्वस्त आदिनाथ शेटे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला. सरपंच बाळासाहेब बानकर, संदीप अट्टल उपस्थित होते. या दर्शनभेटीची कुणालाच माहिती न दिल्याने माजी मुख्यमंत्र्याच्या मागे शुकशुकाट होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT