Dhananjay Mahadik Greetings to News Minute Hasan Mushrif.gif 
पश्चिम महाराष्ट्र

धनंजय महाडिक यांनी दिल्या मंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा Video

सकाळ वृत्तसेवा

कागल (कोल्हापूर) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी आज तिसऱ्या दिवशीही घराकडे मोठी रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तुर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही नामदार हसन मुश्रीफ यांच्या घरी येऊन शुभेच्छा दिल्या.

<

हे पण वाचा -...तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकेल 

सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्रसिंह मंडलिक, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग तात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर, माजी आमदार संजय घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, जयवंतराव शिंपी, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिद्री साखर कारखान्याचे पदाधिकाऱ्यांनी तसेच आज रविवार सुट्टीचा दिवस असलेने शासकीय अधिकारी यांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, सेवानिवृत उपमुख्य कार्यकारी रावसाहेब चव्हाण, सासवडचे गटविकास अधिकारी टोणपे, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदींचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक संघटना एन. के. कुंभार, कागल तालुकाध्यक्ष साताप्पा कांबळे यांचे सह ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्ते, नागरीक, अधिकारी व राजकीय व्यक्तींच्या गाड्यांनी गैबी चौकात वाहतूकीची कोंडी झाली होती.

हे पण वाचा -सावधान ! जोतिबाला जाताय... 

दरम्यान कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर महापौर सुरूमंजीरी लाटकर, आमदार पी.ए न. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Kolhapur CPR : दोन हजारांत एमआरआय, ३५० रुपयांत सीटीस्कॅन; सीपीआरमधील सुविधेमुळे रुग्णांचा खर्च आणि वेळ वाचला

Year Ender 2025: लोकांनी वजन कमी करण्यापेक्षा हेल्दी राहण्यावर दिला भर; 'हे' ठरले 2025 चे 7 जबरदस्त फिटनेस ट्रेंड्स

Latest Marathi News Live Update: सातारा बामणोलीत ड्रग्ज छापा

SCROLL FOR NEXT