DhawalSingh Mohite Patil
DhawalSingh Mohite Patil 
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : धवलसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर

मनोज गायकवाड

अकलूज : शिवसेना नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी (दि. २०) शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेते मंडळींची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसमधील त्यांच्या प्रवेशाची शक्यता बळावली आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजता त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून यावेळी ते आपली राजकीय भुमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे.

माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचदिवशी धवलसिंहांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेते मंडळींची भेट घेतली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मुंबई येथील निवास्थानी पार पडलेल्या या बैठकीला श्री पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. माजी खासदार रणजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच सायंकाळी धवलसिंह यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधान आले आहे. त्यातच शिवसेनेच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशाची शक्यता व्यक्त होत आहे.

आज दुपारी तीन वाजता 'प्रतापगड' या निवासस्थानी त्यांनी जनसेवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत. या बैठकीनंतर ते आपला राजकीय निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT