आळसंद (सांगली) : आळसंद परिसरात सिध्दनाथाच्या यात्रेनिमित्त तमाशा व कलापथक होण्याची परंपरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडीत झाली आहे. चैत्र महिन्यात आळसंद परिसरात बलवडी, आंधळी, रामापूर, बोरगाव, शिरगाव , मोहिते वडगाव गावांतून भरणाऱ्या वार्षिक जत्रेत तमाशाच्या माध्यमातून गण, गौळण, वग, कृष्ण, सुदामा, मावशी अशी पात्र अवतरून कलात्मक मथुरेचा बाजार भरवला जातो. सवाल - जवाबाने तमाशाला रंग चढतो. मात्र कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने शासनाने सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.
सिध्दनाथ यात्रेत औंधा मथुरेचा बाजार भरलाच नाही. परिसरात वार्षिक यात्रोत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका कलगी तुरा तमाशा ही लोककला जोपासणारे शाहिर व कला पथकांना बसला असून कलेच्या माध्यमातून भरविण्यात येणारे मथुरेचे बाजार शांत झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात्रोत्सवातून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.
वसंत ऋतूची चाहुल लागताच गावगाड्यात जत्रा आणि यात्रा सुरू होतात. ग्रामदेवतेच्या या जत्रा आणि यात्रा म्हणजे ग्रामीण जनतेचे जणू आनंदाची पर्वणीच. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत जत्रा आणि यात्रा यांना महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामोत्सवांमध्ये केवळ लेझीमच चालत नाहीत, तर हलगी आणि ढोलकीही कडाडते. तामशाच्या गायनाने परिसर दुमदुमतो. रात्रभर तमाशा रंगतो. पूर्वापार चालत आलेली तमाशा ही पारंपरिक लोककला अनेक तमाशा कलावंतांनी जोपासली आहे.
रोजगार अभाव असलेल्या सर्वच ठिकाणांवर जत्रा या रोजगाराचे साधनही बनल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येत असल्याने त्यांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा जसे, हॉटेल, मिठाई, लहान मुलांची खेळणी, सौदर्य प्रसाधने यांची रेलचेल अशा ठिकाणी असल्याने यातून अनेकांना रोजगार मिळत असतो.
विविध प्रकारची दुकानांची रांग, कल्पकतेने मांडलेले खेळ यामुळे मुलांपासून मोठ्यांपर्यंत हौसे, नौसे सर्वजण यात्रांना गर्दी करतात. मुख्य म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कलिंगड , काकडी, कोंतबिर यासह अन्य माल विकण्यासाठी प्रमुख बाजारपेठ या जत्रांमुळे उपलब्ध होते. कोरोनामुळे या सर्वांला मुकले आहे.
"कोरोनामुळे परिसरात यात्रेत गर्दीमुळे रद्द केल्या आहेत. याचा फटका आम्हा खेळणी विक्रेत्यांना बसला आहे. 30 ते 35 हजार रूपये खर्चून खेळणी खरेदी केली आहेत. यात्रा रद्द केल्याने आर्थिक बिघडले आहे.
शहानूर विभूते,
खेळणी विक्रेता बलवडी ( भा.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.