पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीला बाजूला ठेवत शेकापचे आता 'एकला चलो रे'

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील समीकरणाचा परिणाम प्रकर्षाने दिसून आला. या निवडणुकीमध्ये शेकापने आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाजूला सारत सभापती व उपसभापती निवडीमध्ये आपली एकहाती सत्ता काबीज केली. या निवडणुकीत शेकापने "एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याचे दिसून आले. 

पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शेकाप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने युती करून एकत्रित निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत शेकाप व राष्ट्रवादीच्या आघाडीला 14 पैकी 10 जागांवर विजय मिळविता आला होता. यामध्ये शेकापचे आठ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्य निवडून आले होते. तर विरोधी शिवसेना युतीला फक्त चार जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर पाच वर्षे सभापतिपद हे शेकापकडे व उपसभापतिपद पाच वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहील असे ठरविण्यात आले होते. विधानसभा निवडणूक पूर्वीची अडीच वर्षे ठरल्याप्रमाणे पार पडली. परंतु गेल्या वर्षानुवर्षांचे मैत्रीचे संबंध असलेल्या या दोन पक्षांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीपासून दुरावा निर्माण झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी स्वतः निवडणुकीतून माघार घेऊन आमदार शहाजी पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद लावली होती. यामुळे या निवडणुकीत शेकापचा पराभव होऊन शिवसेनेचे शहाजी पाटील विजयी झाले होते. 

विधानसभा निवडणुकीपासूनच येथील स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र प्रथमत: पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीमध्ये दिसून आले. हा दुरावाच सध्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीच्या काळातही प्रकर्षाने जाणवला. पाच वर्षांसाठी ठरलेले उपसभापतिपद हे राष्ट्रवादीला न देता बहुमताच्या जोरावर शेकापने सभापतिपदी व उपसभापतिपदी आपल्या दोन्ही उमेदवारांची वर्णी लावली. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कसलाच विचार केला गेला नाही. निवडणुकीमध्ये सभापतिपदी राणी कोळवले व उपसभापतिपदी तानाजी चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने "एकला चलो रे'ची भूमिका घेतल्याने तालुक्‍यात यापुढे होणाऱ्या निवडणुकांची दिशाच ठरवले असल्याची राजकीय चर्चा सध्या तालुक्‍यात सुरू आहे. 

योजना सामान्यांपर्यंत पोचविणार 
मला मिळालेल्या संधीचे मी सोने करणार असून, आमदार देशमुख यांनी माझ्यावर दाखवलेला विश्‍वास सार्थ करून दाखवीन. शिक्षण, आरोग्य व कृषी विभागाकडे विशेष लक्ष देऊन या योजना सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. घरकुलसारख्या योजना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
- तानाजी चंदनशिवे, उपसभापती, सांगोला 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT