Koyna Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

कोयनेतून 50 हजार विसर्ग सुरु! सांगलीत आयर्विनला 18 फुटापर्यंत पाणी

विष्णू मोहिते

वारणा धरणातून 8 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.

सांगली: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणातून आज दुसऱ्या दिवशी 50 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. वारणा धरणातून 8 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. रात्री दहा पर्यंत 28 फुटावर पाणी जाण्याची शक्यता असून नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अलमट्टी धरणातून 57 हजार क्युसेसने विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात किरकोळ रिमझिम पाऊस सुरु आहे. कोयना पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सायंकाळी 7 वाजता धरणाची वक्रद्वारे 5 फुट 3 इंच उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 50 हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार आहे. धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

Lonavala Heavy Rain : चोवीस तासांत १३१ मिमी पाऊस; लोणावळ्यात जोरदार पावसाने सखल भाग जलमय

FIFA World Cup 2026 : पैशाने नाही विकत घेता येत गुणवत्ता; वर्ल्डकप फुटबॉलमधील सौदी, कतारच्या अपयशानंतर अधोरेखित

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी ४ वाजता सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT