Dispute when Removing Illegal boards  
पश्चिम महाराष्ट्र

बेकायदा फलक हटविताना वादावादी

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात विविध दुकानांच्या बाहेर लावले जाणारे मोठ्या कंपन्यांचे डिजिटल फलक बेकायदेशीर असल्याने महापालिकेने आजपासून हे फलक हटविण्याची कारवाई सुरू केली. मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईड या इमारतीवरचा एका मोबाईल कंपनीचा फलक काढताना दुकानदाराचे शटरही निघाल्याने दुकानदार आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. 

दुकानदारांनी जेसीबी रोखून धरल्यानंतर बराच वेळ हा वाद सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर वाद निवळला. यामुळे काही काळ मिरजकर तिकटी येथे वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

सकाळी अकराच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील ईगल प्राईडच्या येथे एका मोबाईल शॉपीचा फलक हटविण्याचे काम महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केले. या वेळी फलक काढताना दुकानाचे शटरही निघाले. यावरून दुकानदाराने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालायला सुरवात केली. हा वाद वाढत गेला. दुकानदाराने महापालिकेचा जेसीबी रोखला. यावरून जोरदार खडाजंगी झाली. शटरचे नुकसान महापालिकेने भरून द्यावे, अशी दुकानदाराने मागणी केली. बेकायदेशीर फलक लावणाऱ्या कंपनीकडूनच ही नुकसानभरपाई घ्या, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. हा वाद वाढत गेला. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच पोलिस आले. त्यांनी समजूत काढत हा वाद मिटविला. मोबाईल कंपनीचे प्रतिनिधीही तेथे आले. महापालिका अधिकारी आणि मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. 

फलक हटाओ सुरूच राहणार 
शहरात दुकानांच्या बाहेर जे विविध कंपन्यांचे फलक लावले जातात त्याचेही शुल्क आकारण्याचा ठराव महापालिकेत झाला आहे; पण या कंपन्या याबाबत टाळाटाळ करतात. याची जबाबदारी ना दुकानदार घ्यायला तयार आहेत, ना मोबाईल कंपन्यांसह विविध कंपन्या. त्यामुळे इस्टेट विभागाने वारंवार सांगून, मुदत देऊनही या फलकांचे शुल्क भरायला कोणीही तयार नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आजपासून कारवाईला सुरवात केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; ख्रिसमसमुळे गुंतवणूकदार सावध; मात्र ओला इलेक्ट्रिकचे शेअर चर्चेत

Netflix जाम केलं अशी वेब सिरिज... थरार, सस्पेंस अन् ट्विस्ट, महाराष्ट्रात Google ट्रेंडमध्ये अव्वल, ख्रिसमस सुट्टीत मिस करू नका

Ayyappa Devotee Case : घरच्यांनी अय्यप्पा स्वामींची माळ घालू न दिल्याने 14 वर्षीय मुलाने घेतला गळफास; आईचा हृदय पिळवटणारा आक्रोश

Kolhapur Flashback : तीन वेळा महापौरपद हुकले, तरीही न डगमगलेले नेतृत्व; बळिराम पोवारांची जिद्दी राजकीय कहाणी

PMC Election: एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा, भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या उंबरठ्यावर! राजकीय भूकंप येणार?

SCROLL FOR NEXT