District Bank Leads in Debt Waiver Process marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

कर्जमाफी प्रक्रियेत 'ही' बॅंक आघाडीवर

विनायक लांडे

नगर : ""महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आधार बेस योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश आहे. जिल्हा सहकारी बॅंकेच्या कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची सर्वाधिक दोन लाख 58 हजार 755 संख्या आहे. त्यातील फक्त 919 शेतकऱ्यांचे आधार अपडेट करण्याचे राहून गेले आहे. जिल्हा बॅंक आधार अपडेटबाबत आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये केवळ 41 हजार 217 खातेदार आहेत. त्यातील तब्बल सात हजार 350 खातेदारांचे आधार अद्यापि अपडेट नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकेचा ढिसाळ कारभार या निमित्ताने समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल, व्याजासहित थकीत असलेली व परतफेड न झालेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जास माफी दिलेली आहे. 

आधार व मोबाईल क्रमांकाची माहिती

कर्जमाफीसाठी दोन लाखांपर्यंतच्या थकीत कर्जाचे कर्जदार शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक याची माहिती घेण्याचे काम सहकार विभागातर्फे सुरू आहे. 

लाभार्थींची माहिती तपासण्याचे काम

जिल्ह्यात 1400 विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. यापैकी 900 सोसायट्यांचे कामकाज संगणकीकृत झाले आहे. उर्वरित सोसायट्या संगणकीकृत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, आधार क्रमांकाची माहिती संबंधित संस्थेकडे जमा करावी. 70 लेखापरीक्षक पात्र लाभार्थींची माहिती तपासण्याचे काम करीत आहे. पात्र लाभार्थींच्या याद्या संस्था व बॅंकांच्या शाखेत उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी माहितीची शहानिशा करावी, काही अडचण वाटल्यास जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधावा.

एक फेब्रुवारीपासून माहिती पोर्टलवर

जिल्हा बॅंकेतील कर्जदारांची संख्या दोन लाख 58 हजार 755 आहे. त्यांची थकीत रक्कम 1543.52 कोटींची आहे. एक फेब्रुवारीपासून माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. 15 मेपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

आधार अपडेट करावे

कर्जमाफी आधारबेस योजना असल्यामुळे कुठलाही अर्ज करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही. मात्र, जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे आधार, मोबाईल क्रमांक बॅंका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये अपडेट नाही, अशा शेतकऱ्यांनी संबंधित बॅंका, सोसायट्यांमध्ये जाऊन आधार अपडेट करावे. 
- हरिश्‍चंद्र कांबळे, सहायक निबंधक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT