images.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

पंतप्रधान किसानमधून जिल्ह्याला मिळाले 153 कोटी

विष्णू मोहिते

सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील पी. एम. किसान योजनेतून मिळणारा निधीही शेतकऱ्यांसाठी महत्वांचा टप्पा ठरतो आहे. विशेष म्हणजे योजना सुरु झाल्यापासून मार्च 2020 अखेर जिल्ह्यातील 2.70 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 153 कोटी रुपये जमा झालेले आहेत.

केंद्राने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन-दोन हप्ते जमा केले आहेत. यामुळे हा आकड्यात पुन्हा मोठी किंवा आणखी तेवढीच वाढ अपेक्षीत आहे. पी. एम. किसान योजनेचे अनुदान महत्तम जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 70 हजार 519 एवढी आहे. योजनेसाठी 3.95 लाख शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले होते. त्यातील परिपूर्ण प्रस्ताव 3.17 लाख आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी डिसेंबर 2018 च्या अखेरीस देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी जमा केल्याचे जाहीर केले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. 4 फेब्रुवारी 2019 रोजी योजनेला केंद्राने मान्यता मिळाली. जिल्ह्यातील पात्र खातेदारांची संख्या 4 लाख 97 हजार आहे.

निकषानुसार अपात्र धरले तर जिल्ह्यातील खातेदारांची संख्या सात लाखावर असू शकेल. जिल्ह्यातील 3.95 लाख प्रस्तावापैकी आजअखेर 3.17 लाख शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज पात्र ठरले आहेत. त्यापैकी 2.70 लाखांना पहिला, 2.60 लाख शेतकऱ्यांना दुसरा, 1.75 लाख हजार शेतकऱ्यांना तिसरा आणि 62 हजार शेतकऱ्यांना चौथा हप्ता मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात "पंतप्रधान किसान सन्मान निधी' योजनेची घोषणा केली होती. 1 डिसेंबर 2018 पासून या योजनेची देशभरात राबविण्यात येत आहे. 

  •  पीएम किसानसाठी तीन लाख 95 हजार प्रस्ताव 
  •  पैकी तीन लाख 15 हजार शेतकऱ्यांची माहिती बरोबर 
  •  पहिला हप्ता-2 लाख 70 हजार 519 
  •  दुसरा हप्ता- 2 लाख 60 हजार 530 
  •  तिसरा हप्ता- 1 लाख 75 हजार 532 
  •  चौथा हप्ता- 61 हजार 992 
  • ( आकडेवारी मार्च-2020 अखेरची ) 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT