do not complain against for anil benake 
पश्चिम महाराष्ट्र

आमदार अनिल बेनकेंची तलवार म्यान? 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : चव्हाट गल्ली शाळेच्या जागेच्या विक्रीप्रकरणी तक्रार दाखल होऊन चार दिवस लोटले आहेत. मात्र, मार्केट पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंद केलेला नाही. या प्रकरणात कोण दोषी आहे, याची माहिती घेऊनच गुन्हा नोंद केला जाईल, असे मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक संगमेश शिवयोगी सांगत आहेत. दरम्यान, पोलिसात तक्रार झाल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली जाते; पण या प्रकरणात आधी चौकशी करून मग गुन्हा नोंद करण्याची भूमिका मार्केट पोलिसांनी घेतली आहे. याप्रकरणी बेळगावच्या अतिरिक्त सरकारी वकिलांशी निरीक्षक चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

एखाद्या व्यक्तीने किंवा खासगी संस्थेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा नोंदविला तर ती बाब समंजस ठरू शकते; पण महापालिकेने केलेल्या तक्रारीची पडताळणी पोलीस करीत आहेत. त्यामुळे यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणात प्रारंभी आक्रमक भूमिका घेतलेल्या आमदार अनिल बेनके यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे. 17 जानेवारी रोजी त्यांनी घेतलेल्या बैठकीत जे आदेश दिले, त्याची अंमलबजावणी झाली की नाही, याचा आढावा घेण्यासाठी आठवडाभरात ते पुन्हा बैठक घेणार होते; पण दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी त्यांनी बैठक घेतलेली नाही. मार्केट पोलिसांना आमदार बेनके यांनी सूचना दिली तर लागलीच गुन्हा नोंद होऊ शकतो. मात्र आमदार गप्प आहेत. 

2016 साली चव्हाट गल्ली शाळेच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी बेनके आमदार नव्हते. त्यावेळी शाळेच्या प्रकरणात महापालिकेवर मोर्चा निघाला होता, त्यात बेनके आघाडीवर होते. त्याचा फायदा त्यांना 2018 च्या विधानसभा निवडणुकीत होऊन ते निवडून आले. आता त्याच शाळेची जागा विकल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आमदार बेनके यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पाठपुरावा करणे आवश्‍यक होते; पण तसे होताना दिसत नाही. शाळेच्या जागेपैकी 12 गुंठे जागा खरेदी करण्यासाठी बिरेश्वर पतसंस्थेने करार केला आहे. त्यासाठी तब्बल आठ कोटी रुपये रक्कम आगाऊ देण्यात आली आहे. ही बिरेश्वर पतसंस्था कोणाची आहे, याची आमदार बेनके तसेच बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांनाही कल्पना आहे. त्यामुळेच आमदार बेनके यांनी आपली तलवार म्यान केल्याची चर्चा माजी विद्यार्थ्यांमध्ये सुरू झाली आहे. 

...तर शाळेच भवितव्य टांगणीला 
2016 साली तत्कालिन फिरोज सेठ यांनी मराठी शाळा वाचविण्याच्या प्रयत्नात आडकाठी आणली नाही. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करून कागदपत्रे मिळवत सर्वोच्च न्यायालयात लढा दिला. आता महापालिका, पोलीस व लोकप्रतिनिधींचीही भूमिका संशयास्पद आहे. मोक्‍याच्या जागी असलेल्या शाळेच्या दोन एकर जागेवर अनेकांचा डोळा आहे. ती जागा काहींसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरू शकते. त्यामुळेच शाळेच्या जागेचा विक्री व्यवहार दडपण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत; पण हा प्रकार यशस्वी ठरल्यास चव्हाट गल्ली शाळेचे भविष्याच टांगणीला लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT