karhad
karhad 
पश्चिम महाराष्ट्र

'मराठा समाजाच्या नावाने कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी करू नये'

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : राज्य सरकार व निवडणूक आयोगाने मराठा समाजाच्या नावाने कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी करू नये, अशी मागणी कऱ्हाड तालुका सकल मराठा समाजातर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची सातारा येथे भेट घेवून मराठा क्रांती मोर्चातर्फे सकल मराठा बांधवांनी हे निवेदन दिले. त्यातील आशय असा ः मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा समन्वय समिती, मराठा क्रांती ठोक मोर्चा या तसेच मराठा समाजाच्या निगडीत नाव असणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी महाराष्ट्र राज्य शासनाने व निवडणूक आयोगाने करू नये. आजअखेर निघालेले मराठा क्रांती मोर्च हे कोणाच्याही नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निघालेले नाहीत.

छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांचेच त्याला नेतृत्व होते. त्यामुळे या नावाने राजकीय पक्ष स्थापन झाल्यास मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील समन्वय समिती सदस्य, मराठा समाजाचे सेवक व मराठा समाजाच्या नावाने तयार झालेल्या राजकीय पक्षाची भूमिका यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. स्वतःचे राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी या नावाने तयार झालेला राजकीय पक्ष मराठा समाजास वेठीस धरू शकतो. त्यामुळे त्याची नोंदणी करण्यात येवू नये. याची दखल घेवून राज्य शासनानाच्या प्रशासनाने निवडणूक आयोगाला द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT