do not want lockdown in Sangli district, strict restrictions are needed: Sur in all party meeting 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन नको, कठोर निर्बंध हवे : सर्वपक्षीय बैठकीत सूर

शैलेश पेटकर

सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत. वाढता संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय योग्य नसून कठोर निर्बंध करणेचे गरजेचे आहे, असा सूर सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत उमटला.

येथील कष्टकऱ्यांची दौलतमधील सभागृहात समितीची आज बैठक झाली. 
राज्यातील संपूर्ण परिस्थिती पाहता लॉकडाऊन हा कोरोना वरील काही उपाय नाही. मागील वेळेस केलेला लॉकडाऊन हा आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी, आवश्‍यक ती बेड संख्या वाढवण्याकरता करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरात झालेल्या आरोग्यसुविधा वाढत्या कोरोना रुग्णासाठी आता कामात येणे आवश्‍यक होते. त्यामुळे आताच्या परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करणे हे पूर्ण चुकीचे असणार आहे, त्यामुळे संपूर्ण समाजभावना लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन करण्यात येऊ नये, अशी मागणी समितीचे सतीश साखळकर यांनी केली. 


योग्य आणि आवश्‍यक त्या सर्व निर्बंधासहित सर्व व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यावरच आता सर्व आर्थिक चक्र अवलंबून आहे अन्यथा हे आर्थिक गाडा पुन्हा रूतेल, अशी चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली. शासनाने सर्व रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना अंतर्गत लाभ देण्यात यावा आणि कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावी, अशी मागणीही यावेळी बैठकीत करण्यात आली.

कोरोनासाठी सुरू असलेले लसीकरण गतीने पूर्ण करून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण झाले पाहिजे. जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी यांनी सर्वपक्षीयांची बैठक आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली. 


यावेळी सतीश साखळकर, डॉ. संजय पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, विकास मगदूम, असिफ बावा, नगरसेवक अभिजित भोसले, संतोष पाटील, युवराज बावडेकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, संदीप टेंगले, दादासो बंडगर, रेखा पाटील, अतुल माने, दीपक माने, प्रशांत भोसले, फारुक संगतरास, हृषीकेश पाटील, मयूर घोडके, तानाजी रुईकर, लालू मेस्त्री, आश्रफ वाणकर, अमर पडळकर, शैलेश पवार, यश माने, सत्यशील कांबळे, सुहेल तांबोळी, माधुरी वसगडेकर उपस्थित होते. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT