Doctors have not visited Jat check post for four days 
पश्चिम महाराष्ट्र

या  चेक पोस्टवर डॉक्‍टर चार दिवस फिरकलेच नाहीत... म्हणून

सकाळवृत्तसेवा

जत (जि. सांगली) : तालुक्‍यात चेक पोस्टवर चार-चार दिवस डॉक्‍टर फिरकतच नाहीत. बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी शुक्रवारी सिंगनहळ्ळी चेक पोस्टवर अचानक भेट देऊन आरोग्य विभागाचा पंचनामा केला. येरेकर यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्‍टर यांना चांगलेच धारेवर धरले. 

तालुक्‍यात प्रवेशद्वारावर नऊ चेक पोस्ट तैनात केले आहेत. तालुक्‍यात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी चेक पोस्टवर व्हावी, यासाठी याठिकाणी प्राथमिक शिक्षण व आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमलेले आहेत. मात्र, याठिकाणी डॉक्‍टरच फिरकत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानिमित्ताने तालुक्‍यातील नागरिकांचे आरोग्य किती सुरक्षित आहे, याचा प्रत्यय समोर आला आहे. अंकले, वाळेखिंडी व आवंढी गावात प्रवेश केलेले नागरिक मुंबई, पुणे येथून जत तालुक्‍यात दाखल झाले होते. यातील काहींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

याशिवाय खासगी बसचा सफाई कामगार, त्या बसचा ड्रायव्हर पॉझिटिव्ह निघाला. ड्रायव्हरच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबासह 6 जणांना संस्थात्मक; तर इतर 15 हून अधिक लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. ड्रायव्हरचा अनेक ठिकाणी संपर्क राहिला असल्याने एमआयडीसी परिसर, मोरे पेट्रोल पंप परिसर, सैनिकनगर, अशा काही ठिकाणी प्रशासनाला कंटेन्मेंट व बफर झोन जाहीर करावा लागला आहे. तालुक्‍यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसताना चेक पोस्टवर येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी झाली का? त्यांना होम क्वारंटाईन केले असताना या काळात लोकांचा संपर्क कसा आला?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

चेक पोस्टवर येणाऱ्या लोकांची तपासणी ही झालीच पाहिजे. आरोग्य विभागाने दक्षता घेतली पाहिजे. जो डॉक्‍टर नेमलेल्या चेक पोस्टवर हजर नसेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचना करून, सिंगनहळ्ळी चेक पोस्टवर डॉक्‍टर नसणे, आरोग्य विभागाने काही कामात कसूर केल्याबद्दलचा अहवाल सादर करण्याचे आदेश श्री. येरेकर यांनी बैठकीत दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. 

हाय रिस्क व्यक्ती असताना एटीएमवर.... 
खासगी बसवरील सैनिकनगरमधील 35 वर्षीय तरुण कोरोनाबाधित असताना तो शहरात अनेक ठिकाणी फिरला. शहरातील एचडीएफसी, स्टेट बॅंकेच्या एटीएमवरही पैसे काढण्यासाठी तो गेला. यावेळी व्यवहार झालेल्या लोकांची लिस्ट आरोग्य विभागाने बॅंकेकडून मागवली आहे. मात्र, हाय रिस्क व्यक्ती असताना व जोडीदाराचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्यानंतर हा तरुण शहरात कसा गेला? आरोग्य विभागाने सुरक्षिततेची कोणती काळजी घेतली? असा सवाल नागरिक विचारताहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT