doctor.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकारी यांच्या इशाऱ्यानंतर  डॉक्‍टरांनी "शटर' उघडले 

सकाळवृत्तसेवा

सांगली-आपत्ती काळात रूग्णसेवेला नकार देऊन "लॉक डाऊन' केलेल्या डॉक्‍टरांना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी इशारा दिल्यानंतर आज "शटर' उघडल्याचे चित्र दिसून आले. "सकाळ' ने याबाबत सलग तीन दिवस पाठपुरावा केल्यामुळे हा परिणाम दिसून आला. अखेर "सोशल डिस्टन्सिंग' चे पालन करत रूग्णसेवा सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. 


"कोरोना' ने सर्वत्र धुमाकूळ घातल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण आढळल्यामुळे धास्ती निर्माण झाली आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी "लॉक डाऊन' चा निर्णय घेतल्यानंतर अत्यावश्‍यक सेवेला यातून वगळण्यात आले होते. परंतू अत्यावश्‍यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या शहरी व ग्रामीण भागातील जनरल मेडिकल प्रॅक्‍टिशनर्सनी स्वयंघोषित "लॉक डाऊन' केले. त्यामुळे रूग्णसेवेवर त्याचा परिणाम दिसून आला. काही खासगी डॉक्‍टरांनी रूग्णसेवेला प्राधान्य देत दवाखाने सुरू केले. परंतू इतरत्र 90 टक्के दवाखाने बंद होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रूग्णालयात गर्दी होऊ लागली. डॉक्‍टरच नसल्यामुळे अनेकांना थेट मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या-औषधे घ्यावी लागली. 


शहरी व ग्रामीण भागातील रूग्णसेवा विस्कळीत झाल्याबद्दल "ई-सकाळ' वर जोरदार आवाज उठवला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जनरल मेडिकल प्रॅक्‍टिशनर्स फोरमशी चर्चा करून "ओपीडी' सुरू करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही डॉक्‍टरांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे "ई-सकाळ' वर पुन्हा बातमी प्रसिद्ध करून रूग्णांचे हाल होत असल्याचे दाखवून दिले. अखेर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी कारवाईचा इशारा दिला. डॉक्‍टरांच्या दवाखान्यावर नोटीसा लावण्याचे आदेश दिले.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्यावतीने दवाखान्याच्या दरवाजावर नोटीसा चिटकवण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणून आज अपवाद वगळता सर्वच डॉक्‍टरांनी "लॉक' काढून रूग्णसेवेस प्रारंभ केला. 
आज शहरी व ग्रामीण भागात डॉक्‍टरांनी "सोशल डिस्टन्सिंग' चे पालन करत रूग्ण तपासून गोळ्या-औषधे देण्यास प्रारंभ केला. रूग्णांसाठी दवाखान्याच्या बाहेरच मास्क व सॅनिटायझर्सची सुविधा उपलब्ध करून दिली. दवाखाने सुरू झाल्यामुळे रूग्णांनी समाधान व्यक्त केले. दोन-तीन दिवस मेडिकल्समध्ये असणारी गर्दी आज दवाखान्याबाहेरही दिसून आली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT