1Corona_Danger_19 
पश्चिम महाराष्ट्र

"शहरी गर्दीत नको...आता गावाकडे चला' 

सकाळवृत्तसेवा

लेंगरे (सांगली) : सध्या जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक जिल्हेदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ग्रामीण भागातील युवक नोकरीनिमित्त नेहमी मुंबई, पुणे या शहरांकडे जातानाचे चित्र आतापर्यंत होते. रोजगारासाठी ग्रामीण भागातून जाऊन तिथेच संसार थाटत होते. मुलीकडून पसंतीही मुंबई, पुण्यातील मुलांना दिली जात असे. सध्या मात्र कोरोना या संसर्गजन्य रोगाची धास्ती असल्याने प्रत्येकाची पावले पुन्हा गावाकडे वळू लागली आहेत. 
चीनमधून सुरू झालेला कोरोनाच्या जीवघेण्या रोगाचा प्रसार जगभर झाला. अगदी दाराजवळ येऊन ठेपला आहे. 


पुण्यात रहिवासी असलेल्या जावई-लेकींनी शहराच्या गर्दीत नको. आता गावाकडेच चला, असे म्हणत ग्रामीण भागातील गावांचा रस्ता धरला आहे. भागातील बरचशे लोक सराफी,गलाई व्यासायासाठी पुण्यासह अन्य ठिकाणी स्थायिक असलेली कुटुंबे गावाकडे परतताना दिसत आहेत. 
तालुक्‍यातील टेंभुचा बागायती भाग सोडला, तर अनेक गावे दुष्काळी म्हणूनच ओळखली जातात. मुबलक पाणी, रोजगार निर्मिती, दळण-वळण अशा अपुऱ्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक मुली शहरी भागात नांदायला गेल्या. दुष्काळाचा सामना करीत जे आपण भोगले आहे. त्या यातना मुला-मुलींच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून लग्नानंतरच्या आयुष्यात शहरी भागाला पसंती दिली जात होती. 


शहरी भागात दिवसेंदिवस होत असलेली गर्दी, वाढते प्रदूषण, अपघात आणि त्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचे वाढते प्रमाण यामुळे खेड्यातील जीवनच आरोग्यदायी असल्याच्या मताला अनेकांकडून शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. त्याला कोरोनो रोगाच्या भितीने बळ मिळाले आहे. गलाई व्यावसायिकांचे बरचशे व्यवसाय इतर देशातही सुरु आहेत. त्यांची मुले मली गावाकडे आल्यानंतर मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु कोरोनाच्या भितीने फॉंरेन रिटर्न हवा गेली आहे. 

 

"फॉरेन रिटर्न' ची हवा गेली 

नोकरी, गलाई व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातील अनेक तरुण परदेशात जातात. ग्रामीण भागातील सोहळ्यानिमित्त ते थाटात उपस्थित राहतात. त्यावेळी फॉरेन रिटर्न ही कुजबुज प्रतिष्ठेची वाटायची. आता मात्र परिस्थिती उलटी आहे. फॉरेन रिटर्न म्हटलं, की कोरोनाची लागण तर झाली नसेल ना ? अशा संशयाने त्यांच्याकडे पाहिले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT