Buy a cheap motorcycle be alert 
Buy a cheap motorcycle be alert  
पश्चिम महाराष्ट्र

सावधान ! स्वस्तातली मोटारसायकल घेताय

राजेश मोरे

कोल्हापूर : शेताच्या कामासाठी वापरण्यासाठी किंमती मोटारसायकल पाच दहा हजाराला घ्या, निम्मे पैसे आता द्या, बाकीची कागदपत्रे पूर्ण झाल्यावर द्या... असे अामिष दाखवून चोरीच्या मोटारसायकल विकण्याचा फंडा चोरटे वापरू लागलेत. ग्रामीण भागातील अशिक्षितांना टार्गेट केले जात आहे. प्रबोधनासह संशयितांच्या माहितीसाठी पोलिसपाटलांची मदत घेण्यास पोलिस दलाने सुरवात केली आहे

शहरातील गजबजलेला भाग असो अगर निर्जन, बस स्थानक असो वा रेल्वे स्थानक येथे लावलेल्या मोटारसायकल सुरक्षित राहतील, याचा आता नियम राहिलेला नाही. दिवसा असो वा रात्री जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान एक तरी मोटारसायकल चोरीला गेल्याची नोंद होत असते. मोटारसायकल चोरट्यांनी दोन चार वर्षात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मोटारसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्या तुलनेत गुन्ह्याचा शोध लागत नसल्याचे चित्र आहे. शहरात सीसी टीव्हीचे जाळे असूनही मोटारसायकल चोरटे हे मोकाट राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

चोरीच्या मोटारसायकल दुर्गम ग्रामीण भागातील शेताच्या बांधावरच राहिल्या तर त्या सापडणे अवघड असते. कारण या मोटारसायकल कधी शहरात येत नाहीत ना कधी सीसी टीव्हीच्या अगर पोलिसांच्या नजरेत येत नाहीत. यापूर्वी तपासात हाती लागलेल्या १०३ संशयित चोरट्यांच्या चौकशीत चोरीच्या मोटारसायकल त्यानी ग्रामीण भागातच विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे पुढे आले आहे. हात धागा पकडून पोलिस मोटारसायकल चोरट्यांच्या शोधासाठी आक्रमक झाले आहेत

 मोटारसायकल खरेदी करतानाची खबरदारी

गावात कोणी जुनी मोटारसायकल स्वतः खरेदी केली अगर करण्याचा प्रयत्न करत आहे का?, त्याची कागदपत्रे पूर्ण आहेत का? वाहन विक्रीसाठी आलेला व्यक्ती कोण आहे? याबाबतची माहिती भागातील पोलिस पाटलांनी दक्ष राहून घ्यावी. याबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करावे आणि शंका वाटल्यास संबधित संशयिताची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी पोलिस पाटील यांना केले आहे. त्यानुसार पोलिस ठाण्याना हद्दीतील गाव गावात पोलिस पाटलांच्या संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

२०१९ अखेर जिल्ह्यातील चोरीचा तपशील
प्रकार    गुन्हे घडले    उघड       
मोटारसायकल    ४६८    १३०
दरोडा    २८    २८
जबरी चोरी    १४२    १०६
घरफोडी    ३५६    १३९
इतर चोरी    ४३५    १२७

पोलिसपाटलांची मदत गरजेची
चोरीच्या मोटारसायकलचे व्यवहार हे दुर्गम आणि ग्रामीण भागातच अधिक होत असतात. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसपाटलांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
- तानाजी सावंत (पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT