CHANDRAHAR PATIL 1.jpg
CHANDRAHAR PATIL 1.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारचा आता पाच दिवस पोलिस कोठडीत मुक्काम

सकाळवृत्तसेवा

विटा (सांगली)- तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार सुभाष पाटील ( वय 37, रा. भाळवणी ) व सागर श्रीमंत सुरवसे ( वय 19, रा. कंडारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद ) या दोघांना आज विटा न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. 


वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा, या कारणावरून तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना चंद्रहार पाटील व त्याचा साथीदार सागर सुरवसे या दोघांनी पंधरा दिवसापुर्वी मारहाण केली होती. मारहाणीनंतर हे दोघेही पसार झाले होते. तहसिलदार शेळके यांनी दोघांविरूद्ध विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पसार झालेल्या दोघांना अटक करण्याची मागणी होत होती. महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. पोलिस दोघांचा शोध घेत होते. 


आटपाडी तालुक्‍यातील दिघंची येथे चंद्रहार येणार असल्याची माहिती "एलसीबी' चे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना खब-याद्वारे मिळाली होती. त्यानुसार दिघंची -पंढरपूर रोड परिसरात रविवार (ता.17) दुपारी चारच्या सुमारास सापळा रचून हॉटेल अथर्व समोर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर विटा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. विटा पोलिसांनी दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस तपासासाठी कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायाधीशांनी पाच दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT