Rohini-Dhawale 
पश्चिम महाराष्ट्र

हुंड्याच्या जाचाला दीडशतकी दणका!

विशाल पाटील

दीड वर्षात १५६ गुन्हे; सुशिक्षित जमान्यात आजही घडताहेत त्रासदायक घटना
सातारा - व्यवसाय करायचा आहे... गाडी घेणार आहे... घर बांधायचेय... कर्ज फेडायचे आहे... माहेरून पैसे आण... काय दिले तुझ्या आई-बापाने... यांसह अनेक वाक्‍ये नवविवाहितेचे काळीज चिर्रर्र करून टाकतात. हे प्रकार हुंडा प्रतिबंधक कायद्याने गुन्हा असतानाही आजच्या सुशिक्षित जमान्यात जानेवारी २०१८ पासून विवाहितेच्या छळ प्रकरणात तब्बल १५६ गुन्हे दाखल झाले आहेत.

विवाह जुळविताना ‘दिले-घेतले’ जाते. पण, हीच ‘भेट’ कधीकधी मुलीला घातक ठरत असते. कायद्यानुसार हुंडा देणे-घेणे ही वाईट प्रथा ठरते. हुंड्यासाठी छळ होऊन अनेक युवतींनी स्वत:ची जीवनयात्रा संपवली असल्याच्या अनेक घटना आहेत. तरीही या घटनांनी डोळ्यात अंजन घातले गेलेले दिसत नाही. अशा प्रकारांना आळा बसविण्यासाठी शासनाने हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कलम तीन अन्वये हुंडा देणे किंवा घेणे कायद्याने गुन्हा ठरविले आहे. 

विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहासंबंधित कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना किंवा अन्य कोणासह विवाहावेळी, विवाहापूर्वी अथवा विवाहानंतर दिलेली किंवा द्यायची कबूल केलेली कोणतीही संपती, रक्‍कम, मौल्यवान्य वस्तू देणे म्हणजे हुंडा देणे असे कायद्याने निश्‍चित केले आहे. स्त्रीचा विवाह झाल्यापासून सात वर्षांच्या आत अनैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यास व त्यासाठी तिचा छळ होत असल्याचे आढळून आल्यास त्या मृत्यूला हुंडाबळी असे संबोधले जाते.

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये १०३, जानेवारी ते मे २०१९ या कालावधीत ५३ इतके विवाहितेच्या छळप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर न्यायालयात खटले सुरू आहेत. तसेच गतवर्षी दोन हुंडाबळी गेले आहेत. अशा प्रकारे कोणा विवाहितेचा जाचहाट होत असेल तर तक्रार आमच्याकडे करावी.
- रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

हुंड्याचा जाच रोखण्यासाठी समिती
महिला व बालविकास विभागाने हुंड्याचा जाच रोखण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर महिला आणि बालविकास अधिकारी व तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीकडे तसेच सातारा जिल्ह्यात कऱ्हाड येथील आशाकिरण वसतिगृह आणि साताऱ्यातील सखी ‘वनस्टॉप सेंटर’मध्येही महिलांना तक्रारी करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress on Thackeray Brother alliance ...म्हणून काँग्रेसने राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीत सामील होण्यास दिला नकार!, वडेट्टीवारांनी नेमकं कारणच सांगितलं

PAN-Aadhaar linking : 31 डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड होणार रद्द? ₹1,000 दंड द्यावा लागेल? जाणून घ्या मोठा अपडेट!

Dhule Municipal Election : भाजप-शिवसेना नेत्यांची बंद दाराआड खलबते; जागावाटपाचा पेच सुटणार की स्वबळाची तयारी सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बसले आमरण उपोषणाला

तुमच्यात कट्टर वैर होतं? श्रीदेवीसोबतच्या वादावर अखेर माधुरी दीक्षितने सोडलं मौन; म्हणाली- आम्ही दोघी...

SCROLL FOR NEXT