पश्चिम महाराष्ट्र

 कुरळप आश्रमशाळेतील मुलांना विनामुल्य शिक्षण देणार - डॉ. प्रताप पाटील

धर्मवीर पाटील

इस्लामपूर - कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर गेल्या १० दिवसात मुले शैक्षणिक सुविधांपासून अलिप्त आहेत, परीक्षा तोंडावर आहेत, अशा स्थितीत श्री. वारणा शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये या सर्व मुलांना विनामुल्य शिक्षण देण्याची घोषणा संस्थेचे सचिव व राज्य सहकारी संघ पुणेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

कुरळप आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत ३७० विद्यार्थी सध्या शिक्षणापासून वंचित आहेत. या गरीब, अनाथ व मागासवर्गीय विविध घटकातील आधार नसलेल्या विद्यार्थ्यांची शासनस्तरावर अजून कोणतीही व्यवस्था झालेली नाही. तसेच स्थानिक १२० विद्यार्थ्यांनी अजून कुठेही प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सामाजीक बांधिलकी म्हणून श्री. वारणा शिक्षण संस्था ऐतवडे खुर्द संचलित कुरळप व ऐतवडे खुर्दमधील पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखेमध्ये मागेल त्या विद्यार्थ्यांस विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

सामाजिक बांधिलकी म्हणूनच संस्थेचा पुढाकार आहे. बारावी नंतर जरी या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आमच्याकडे प्रवेश घ्यायचा असेल तरीही त्यांना विनामूल्य प्रवेश देऊ,

- डॉ. प्रताप पाटील 

ते म्हणाले, "२५० निवासी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिक्षण, निवास व भोजनव्यवस्था संस्थेमार्फत करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. विद्यार्थ्यांना कोणताही खर्च  करावा लागणार नाही. सर्व खर्च संस्था करेल. गरजू विद्यार्थी व पलकांनी प्रवेशासाठी माध्यमिक विद्यालय कुरळप, व शिवराज विद्यालय ऐतवडे खुर्द येथे संपर्क साधावा."

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष इलाई मुल्ला, खजिनदार बाबासो पाटील, विश्वस्त आप्पासाहेब खराडे, जगन्नाथ पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT