The driver of the vehicle will now be rewarded by the kolhapur City Traffic Control Branch. 
पश्चिम महाराष्ट्र

नियमात वाहन चालवा अन् बक्षीस मिळवा, कोल्हापूरात उपक्रम......

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - नियमात वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाला आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, वाहन चालविताना नियम पाळले जावेत, यासाठी वाहतूक शाखेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. किमान पंधरा दिवसांतून एक वेळ असा बक्षीस समारंभ होणार आहे. यामुळे आजपर्यंत दंडाची रक्कम भरण्यासाठी शाखेत जाणारे वाहनधारक बक्षीस घेण्यासाठीही शाखेत जाणार आहेत. त्यांना प्रसिद्धीही देण्याचा मानस शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचा आहे.

शहर वाहतूक शाखेचा उपक्रम

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन प्रयोग लोकसहभागातून केले जात आहेत. वाहनधारकांच्या, नागरिकांच्या सूचनांच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीला शिस्त लावली जात आहे. कोल्हापुरात येणारा पर्यटक शहराबद्दलचे मत येथील वाहतूक व्यवस्थेवर ठरवतो. तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूरचे नाव देशभरात आहे. येथे पर्यटनासाठी अनेक संधी आहेत. नैसर्गिक, धार्मिक ठिकाणे आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटनात दिवसेंदिवस भर पडत आहे. यामुळे कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुस्थितीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

नियम पाळणार्यांना मिळणार गिफ्ट व प्रमाणपत्र

नवीन वर्षात शहरात वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी अनेक बदल केले जात आहेत. त्यापैकीच एक सकारात्मक बदल म्हणून नियमात वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाला बक्षीस देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पंधरा दिवसांतून एक दिवस निवडला जाईल. त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते वाहनचालकाला बक्षीस दिले जाईल. बक्षीस गिफ्ट स्वरूपात, वस्तू स्वरूपात, प्रमाणपत्र स्वरूपातही असू शकते. याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही; मात्र बक्षीस  दिले जाणार हे नक्की आहे.


असे निवडणार वाहनचालक

सध्या शहरात सीसीटीव्हीचे जाळे आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर, गर्दीच्या ठिकाणी, चौकात कॅमेरे आहेत. त्याचे कंट्रोल पोलिस अधीक्षक कार्यालयात आहे. येथूनच दहा-बारा दिवस वाहन चालकांचे निरीक्षण केले जात आहे. या निरीक्षणातून या व्यक्ती निवडल्या जातील. त्यांच्या वाहनाच्या क्रमांकावरून त्यांचे पत्ते घेतले जातील आणि त्यांना बक्षीस दिले जाईल.

कोण होणार बक्षीसास पात्र ?

  • सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग जागेच्या मागे वाहन थांबवतो
  • सिग्नलवर डाव्या बाजूला जागा सोडून वाहन थांबवतो
  • पार्किंगच्या ठिकाणीच वाहन लावणे
  • रस्त्याच्या डाव्या बाजूनेच वाहन चालवणे
  • दुसऱ्याला अडथळा होणार नाही, असे वाहन चालवणे
  • वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: पैठणमध्ये पराभूत उमेदवारांचा वाद हिंसक; नेहरू चौकात दगडफेक, पाच जण जखमी

Beed Election Result 2025: बीडमध्ये कधी नव्हे तेच भाजपला आघाडी! तरुण नेत्याचा करिष्मा पण तगडी फाईट सुरु

BMC Election: बीएमसी निवडणुकीत शिंदेसेनेला मशालीपेक्षा ‘पतंग’ची भीती? नवे राजकीय वादळ उठणार,गणित बिघडवणार!

Jaysingpur Nagar Palika News : राजू शेट्टी, सतेज पाटील, धनंजय महाडिक, गणपतराव पाटील विरोधात पण, जयसिंगपुरात यड्रावकरांचा दबदबा कायम

Trimbakeshwar election Result: कुंभमेळ्याच्या भूमीत प्रचाराचा नारळ फोडला, पण निकालात उलट चित्र; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचं कुठं चुकलं?

SCROLL FOR NEXT