वळई (ता. माण) - हातपंपावर पाण्यासाठी धडपडणाऱ्या मेंढ्या.
वळई (ता. माण) - हातपंपावर पाण्यासाठी धडपडणाऱ्या मेंढ्या. 
पश्चिम महाराष्ट्र

पूर्व असो वा पश्‍चिम... वारे दुष्काळाचेच!

दादासाहेब काळेल

दुष्काळाची प्रतिकूलता वाट्याला आलेल्या जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्‍यांतून पाणी, चाऱ्याच्या टंचाईमुळे दरवर्षी मेंढपाळांचे स्थलांतर होते. हे स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी, नैसर्गिक स्थिती सुधारताच ते माणदेशात परततात. पण, गेल्या वर्षापासून दुष्काळी भाग सोडून पश्‍चिमेकडे गेलेले मेंढपाळ परतलेच नसल्याची स्थिती यंदा आहे तर पश्‍चिमेकडेही परतीच्या पावसाअभावी जावळीत स्ट्रॉबेरीची रोपे पडून राहिली आहेत. रब्बीसाठीही सध्या नैसर्गिक प्रतिकूलतेचे आव्हान निर्माण होतच आहे. परिणामी जिल्ह्यात यंदा पूर्व असो वा पश्‍चिम, वारे दुष्काळाचेच, अशी स्थिती असल्याचे समोर येत आहे.

कुकुडवाड - कायम दुष्काळी माण, खटाव तालुक्‍यांमधील मेंढपाळ दरवर्षी उन्हाळ्यातील सहा महिने मेंढ्या चरण्यासाठी आपापले गाव, घरदार सोडून पश्‍चिमेकडील सधन भागाकडे जातात. यंदाच्या तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईमुळे गेल्या वर्षापासून दुष्काळी भाग सोडून पश्‍चिमेकडे गेलेले मेंढपाळ इकडे फिरकलेच नाहीत. दुष्काळामुळे त्यांचे स्थलांतर लांबले आहे.

पाणी नाही, मेंढ्यांना चरण्यासाठी गवत नाही, मग इकडे येऊन आम्ही करणार तरी काय? असा त्यांचा प्रश्न आहे. एक वर्षापासून सातत्याने पावसाने दगा दिल्याने हे मेंढपाळ आपला भाग (माणदेश) सोडून अन्यत्र मुक्काम ठोकून राहिले आहेत. पाण्याअभावी या वेळी ऑगस्ट-ऑक्‍टोबर महिन्यात दुष्काळी भागातील अनेक गावे ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळा लांबल्यामुळे माणमधील मेंढीपालन व्यवसायही धोक्‍यात आलेला आहे. मेंढ्यांसाठी पिण्याचे पाणी, चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाऊस पडल्यानंतर सर्वत्र गवत उगवून परिसर हिरवागार दिसतो. त्यामुळे मेंढ्यांचा चाऱ्याचा प्रश्न या दिवसांमध्ये सुटलेला असतो. पावसाने सातारा जिल्ह्यात अल्पशा प्रमाणात हजेरी लावली आहे; परंतु उत्तर माणमध्ये अजूनही पाऊस न पडल्याने मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध न झाल्यामुळे मेंढपाळांपुढे प्रश्न उभा राहिला आहे. मेंढपाळांना आपल्या मेंढ्यांसाठी खराब कांदे विकत घेऊन चारा म्हणून त्यांचा उपयोग करावा लागत आहे. 

पूर्वी शेतात गावठी बाभळीची, लिंबाची झाडे मोठ्या प्रमाणात होती; परंतु आता शेतातील झाडांची संख्या कमी झाल्याने अगदी अल्पशा झाडाच्या पाल्यावर मेंढ्यांची भूक भागवावी लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT