Due to the lockdown in Nipani the economy is locked 
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत लाॅकडाऊनमुळे अर्थकारण 'लॉकच'...

सकाळ वृत्तसेवा

निपाणी  :  सतत महिनाभराच्या लाॅकडाऊनमुळे येथील नगरपालिकेचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे. दरवर्षी मार्चनंतर एप्रिल महिन्यात पालिकेच्या तिजोरीत ८० लाख रुपये घरफाळा जमा व्हायचा. पण आता लाॅकडाऊनमुळे कर वसुली थांबून पालिकेचे उत्पन्न ठप्प झाले आहे.

निपाणी पालिकेचे कररूपाने मिळणारे जवळपास तीन कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न आहे. त्यात घरफाळा, दुकान गाळे भाडे, व्यापारी परवाने नूतनीकरण शुल्क यासह विविध विभागांचा समावेश आहे. घरफाळा हे पालिका उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. दोन कोटीवर घरफाळा पालिकेत वसूल होतो. दरवर्षी मार्चनंतर एप्रिल महिन्यात घरफाळ्यात पाच टक्के सूट असते. त्यामुळे एप्रिलमध्ये फाळा भरण्यास पालिकेत गर्दी असते. पण यंदा लॉकडाऊनमुळे एप्रिलमधील कर वसुली ठप्प झाली आहे.

निपाणी पालिकेचे उत्पन्न थांबले

खरेतर घरफाळा वसुलीला याच महिन्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद असताे. पण यंदा तसे घडलेले नाही. दुकान गाळे भाडे, व्यापारी परवाना शुल्क वसुलीही थांबली आहे. यावर्षी लाॅकडाऊनमुळे शासनाने फाळ्याच्या पाच टक्के सूट सवलतीस मे अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण लॉकडाऊन अजून किती दिवस असणार याच्या अनिश्चिततेमुळे मे महिन्यात देखील फाळा भरण्यास किती लोकांचा प्रतिसाद मिळतो याबद्दल शंका आहे. एकूणच लाॅकडाऊनचा पालिका अर्थकारणावर परिणाम झाला आहे.

 सवलतीत कर भरणा शक्य 
२४ मार्चपासून लाॅकडाऊन जारी झाल्याने गतवर्षीची वसुली पूर्ण करतानाही प्रशासनाला अडथळे आले आहेत. सुमारे दोन कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल वसुलीचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. ९० वसुली नंतर लॉकडाऊन जारी झाल्याने अखेरच्या टप्प्यातील वसुली थकली आहे. पालिकेत महसूल विभाग सुरू असून इच्छुक लोक पाच टक्के सवलतीसह घरफाळा भरू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT