animals.jpg
animals.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मान्सूनपूर्व लसीकरण लांबल्याने या तालुक्‍यात पशुधन धोक्‍यात 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर- कोरोनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेले पशुधन धोक्‍यात येण्याची शक्‍यता.वाळवा तालुक्‍यात मे महिना संपत आला तरी जनावरांना पावसाळ्यात येणाऱ्या साथीच्या रोगाकरिता लसीकरण सुरू नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी नदीकाठच्या काही गावात या रोगाने थैमान घातले होते. तालुक्‍यातील जनावरांचे मान्सूनपूर्व प्रतिबंधक लसीकरण प्रत्येक वर्षी एप्रिल ते जून महिन्यात केले जाते. या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे सर्वत्र लॉक डाऊन जाहीर करण्यात आले.त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून राबविला जाणारा लसीकरण कार्यक्रम याला उशीर होत आहे.
वाळवा तालुका हा सदन तालुका मानला जातो. याच्या दोन्ही बाजूंनी कृष्णा ,वारणा बारमाही वाहत आहेत. पावसाळ्यात या नद्यांना पूर येऊन दुथडी भरून वाहतात.साथीचे आजार हे पुराच्या पाण्यामुळे पसरतात .यामध्ये प्रामुख्याने घटसर्प व अतिसार या विषाणूजन्य रोगाचा धोका जास्त असतो.नद्यांना पूर आला की त्या विषाणूंचा फैलाव होतो. साथीच्या रोगाचा प्रसार होतो. तालुक्‍यातील जास्तीत जास्त गावांना याचा फटका बसन्याची शक्‍यता असते. 


वाळवा तालुक्‍यात राज्य शासनाच्या पशु वैद्यकीय सेवे चा बोज वारा उडले ला दिसून येत आहे. तालुक्‍यात सन 2014 साली केलेल्या पशु गणना अहवाला नुसार एकूण पशुधन एक लाख साठ हजार एवढे होते. त्या मध्ये काही वाढच झालेली असणार. याकरिता वाळवा तालुक्‍यात पशुवैद्यकीय सुविधा करिता राज्य शासन व जिल्हा परिषद यांचे मार्फत नियोजन राबविण्यात येते. राज्य शासनाच्या अंतर्गत तालुक्‍यात 16 ठिकाणी जनावरांच्या दवाखान्यात पशु वैद्यकीय सुविधा सुरवातीस राबविण्यात येत होती. तर पंचायत समिती मार्फत 8 गावामध्ये पशु वैद्यकीय सुविधा राबविण्यात येत होती. आज रोजी तालुक्‍यात राज्य शासनाच्या फक्त 8 केंद्रात पशु वैद्यकीय डॉक्‍टर उपलब्ध असून बाकीचे केंद्रात पशुधन पर्यवेक्षक ही आठ पदे रिक्त आहेत. तर पंचायत समितीची आठ केंद्र सुरु आहेत. त्या केंद्रात तीन पशुधन विकास अधिकाऱ्याची पदे रिक्त आहेत. त्याचे काम त्याठिकाणचे पशुधन पर्यवेक्षक पाहत आहेत. एकूण पशुधन एक लाख साठ हजार व त्याकरिता पशुवैद्यक संख्या फक्त सोळा. प्रति डॉक्‍टर साधारण एक हजार जनावरे वाट्याला येतात. त्यामुळे या सर्वाचा ताण डॉक्‍टरांच्यावर पडत असल्याने वेळीच लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे आहे. अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे. 

"साथीच्या रोगाची लस उपलब्द आहे.तालुक्‍यातील दुधसंघाशी चर्चा करून त्यांच्या डॉक्‍टरांची मदत घेऊन लसीकरणाचे नियोजन केले आहे. मुंबई ,पुणे येथून नागरिक अजून येत आहेत. चार दिवसांमध्ये वातावरण शांत झाले की ज्या गावात कोरोना लागण नाही त्या गावात प्रथम लसीकरण सुरू केले जाईल. शासनाकडून पी. पी. इ. किट मिळालेले नाहीत तरीसुद्धा मास्क,कॅप घालून लसीकरण सुरू करणार आहे." 
डॉ.संजय पवार , 
पशुधन विकास अधिकारी, 
पंचायत समिती ,वाळवा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे," तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवालांचा सनसणीत आरोप

Viral Video: ट्रकच्या धडकेत 'छोटा हाती' पलटला अन् बाहेर पडले 7 कोटींचे घबाड

Pakistan’s Vada Pav Girl: खातो की नेतो? दिल्ली नंतर आता पाकिस्तानमधील वडापाव दिदी झाल्या व्हायरल, चक्क ८० रुपयांचा वडा...

Latest Marathi News Live Update: CM कोल्हापुरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नागरिकांचा चोप

Srikanth film Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ ची जादू; ओपनिंग-डेला केली 'इतकी' कमाई

SCROLL FOR NEXT