due to short circuit the studio from belgaum sadalga fully destroyed lost rupees 5 lakh in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

स्टुडिओला लागलेल्या आगीत ५ लाखाचे नुकसान

राजेंद्र कोळी

सदलगा (बेळगाव) : चिक्कोडी तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सदलग्यातील फोटो स्टुडिओतील साहित्य जळाले आहे. या आगीत ५ लाखाचे नुकसान झाले आहे. बस स्थानक परिसरातील छ. शिवाजी चौकातील महांत डिजिटल फोटो स्टुडिओ इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे जळाला आहे. काल शनिवारी (ता. २४) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत फोटोग्राफीशी संबधित कॅमेरा, कंप्युटर, झेरॉक्स मशीन जळून खाक झाले. यावेळी दुकानचालक सुरेश अल्लाई यांच्या समोर आगीत जळालेल्या साहित्याचा पंचानामा करण्यात आला. त्यावेळी दोन कंम्युटर, दोन झेरॉक्स मशीन, एक कलर झेरॉक्स मशीन, दोन कॅमेरे, फोटो कॉपीचे साहित्य, फर्निचर असे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे.
 

घटनास्थळी पीएसआय आर. वाय. बिळगी, हेडकॉन्स्टेबल जमादार, महसूल खात्याचे सलीम व अकबर सनदी यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदलगा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. सुरेश अल्लाई यांच्या कुटुंबीयांचा चरितार्थ या व्यवसायावर होता. या घटनेशी संबधित अधिकचा तपास पोलीस करत आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

Charlie Kirk: ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी एफबीआयने संशयिताला ताब्यात घेतले

IPS Anjana Krishna : 'IPS अंजना कृष्णा यांना दिली खोटी माहिती'; कुर्डूत 200 ट्रक वाळूचा दावा ठरला फोल, महसूल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT