On Duty 24 Hours: On healthcare while pregnant 
पश्चिम महाराष्ट्र

ऑन ड्यूटी 24 तास : गरोदर असतानाही आरोग्यसेविका कर्तव्यावर

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना विषाणूने सगळीकडेच थैमान घातलेले असताना सर्व जण त्यापासून बचावासाठी घरी थांबत आहेत. मात्र, गर्भवती असलेल्या गुंडेगाव (ता. नगर) येथील वर्षा महेश भापकर यांनी स्वतःच्या आरोग्यापेक्षा जनतेचे आरोग्य महत्त्वाचे मानले आणि कुटुंबीयांचा विरोध डावलून सेवारत राहिल्या आहेत. 
वर्षा भापकर कामरगाव (ता. नगर) येथील जिल्हा परिषदेच्या उपकेंद्रामध्ये आरोग्यसेविका म्हणून काम करीत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तो रोखण्यासाठी सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जनतेच्या आरोग्याची देखभाल आरोग्य विभाग दिवस-रात्र करत आहे. वर्षा भापकर गर्भवती असूनही त्यांनी आरोग्यसेविकेचे स्वीकारलेले व्रत न सोडण्याचा निर्णय घेतला. गर्भवती असल्याने या दिवसांत त्यांनी सुटी घ्यावी, घरी आराम करावा, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना सांगण्यात आले. मात्र, "माझे आरोग्यसेवेचे व्रत मला महत्त्वाचे असून, ते मला करू द्या,' असे म्हणत त्या घरच्यांचा विरोध डावलून कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव केला जात आहे. सोशल मीडियातून त्यांचे कौतुक केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT