Earthen-lanterns-Kolhapur
Earthen-lanterns-Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

Video : मातीपासून बनवलेल्या कंदील, पणत्यांना कोल्हापूरकरांची पसंती!

अर्चना बनगे

कोल्हापूर : आकर्षक आणि रंगीबिरंगी पणत्या खरेदीकडे ग्राहकांचा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा कल आहे. सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात असलेल्या या पणत्यांची सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

'दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार' असं लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. दिव्याचे महत्त्व अगदी लहानपणीच आपल्या कुटुंबीयांनी आपल्या मनात रुजवलेलं असतं. दिव्यांचा लखलखाट आणि आनंदी वातावरण दिवाळीमुळे सगळीकडे निर्माण झालेले असते.

दिवाळीत दिवसाची सुरुवातच मुळात दीपोत्सवाने होते आणि सायंकाळही दीप प्रज्वलित करूनच होते. घरोघरी आकर्षक पणत्या लावलेल्या दिसून येतात. या सणाला दरवर्षी काहीतरी नवीन घ्यायचंच याकडे अनेक महिलांचा कल असतो. बाजारात वेगळं असं काही आहे, याची उत्सुकता अनेकांना असते.

मातीच्या पणत्या आणि कंदीलांवर केलेले सुंदर नक्षीकाम, मातीपासून बनवलेली विविध आकाराची तोरणे, मंदिराच्या आकारातील पणत्या याद्वारे सर्वधर्म समभावाची प्रचिती देण्यात येत आहे. कोल्हापूरमधील स्थानिक मूर्तिकार विविध आकाराच्या पणत्या बनवत असतात. मात्र, गेल्या चार वर्षांपासून कलकत्ता पणती, तोरण बाजारात उपलब्ध झाले आहेत.

सर्वसामान्यांना परवडले अशा दरात या पणत्या उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांनी या पणत्या खरेदी करण्याकडे अनेक महिलांचा कल दिसून येत आहे. मातीचे कंदील आणि त्यावर आकर्षक रंगसंगतीमुळे अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कंदील आकारातील पणतीचा प्रकार पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळे मी यावर्षी कंदील आकारातीलच पणत्या खरेदी करणार आहे.
- प्राजक्ता कुलकर्णी, ग्राहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT